Saisimran Ghashi
१७९५ मध्ये एका ब्रिटीश चित्रकाराने विठ्ठल भक्तांची भक्ती पाहिली. त्याचे नाव जेम्स वेल्स होते. तो स्कॉटलंडचा होता.
जेम्स वेल्स ब्रिटनचा चित्रकार आणि प्रवासी होता. तो १७९१ साली भारतात आला. त्याने भारतातील लोकांचे जीवन आणि मंदिरांची चित्रे काढली.
त्याचा संबंध सवाई माधवराव पेशवे, नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांच्याशी आला. त्याने मराठा दरबारात चित्रे काढण्याचे काम केले.
२४ मार्च १७९५ रोजी तो अहमदनगरजवळच्या ‘लोणी’ गावात पोहोचला. तिथे त्याला एका धर्मशाळेजवळ विठ्ठल आणि रुक्मिणीचे मंदिर दिसले.
मंदिरात काळ्या दगडात कोरलेल्या मूर्ती होत्या. विठ्ठलाला तो ‘इटुल बा’ आणि रुक्मिणीला ‘रचिमी’ म्हणतो. मंदिर साधे पण भक्तिभावपूर्ण होते.
जेम्स लिहितो, "लोक या मूर्तींची खूप भक्ती करतात. ते नाचतात, गातात आणि मोठ्याने जयघोष करतात!"
पुण्याहून ६० कोस (जवळपास १८० किलोमीटर) अंतरावर ‘पंढरपूर’ नावाचे गाव आहे. ते विठ्ठल आणि रुक्मिणीचे मोठे तीर्थक्षेत्र आहे.
जेम्स वेल्स लिहितो, "प्रत्येक वर्षी लोक पंढरपूरला चालत जातात." त्याने हजारो लोकांची ही यात्रा स्वतः पाहिली.
वारीत लोक "विठ्ठल, विठ्ठल बा, रखुमाई!" असे म्हणतात. जेम्सने ते "इटुल बा – इटुल बा – ईटुल रचमाय" असे ऐकले आणि लिहिले.