पनीर की अंडा भुर्जी? जास्त प्रोटीन कशात असते?

Aarti Badade

नाश्त्याचा पौष्टिक पर्याय

सकाळच्या नाश्त्यासाठी पनीर किंवा अंडा भुर्जीचे सेवन करणे हा आरोग्यासाठी अत्यंत झटपट आणि पौष्टिक पर्याय ठरतो.

paneer Bhurji VS Egg Bhurji Nutrition

|

Sakal

प्रोटीनचा उत्तम स्त्रोत

अंड्यामध्ये अमीनो ॲसिड आणि ६-७ ग्रॅम प्रोटीन असते, तर १०० ग्रॅम पनीरमध्ये साधारण १८-२० ग्रॅम प्रोटीनचा साठा आढळतो.

paneer Bhurji VS Egg Bhurji Nutrition

|

Sakal

हाडे आणि मेंदूचा विकास

अंड्यातील व्हिटॅमिन D आणि कोलीन मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर आहे, तर पनीरमधील कॅल्शियम हाडे व दातांना मजबूत करते.

paneer Bhurji VS Egg Bhurji Nutrition

|

Sakal

वजन कमी करण्यासाठी

कमी कॅलरी आणि भरपूर प्रोटीनचा साठा असल्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी अंडा भुर्जी खाणे अधिक फायद्याचे ठरते.

paneer Bhurji VS Egg Bhurji Nutrition

|

Sakal

वजन वाढवण्यासाठी

पनीरमध्ये प्रोटीनसोबत चरबीचे (Fats) प्रमाण चांगले असल्याने बॉडी बिल्डिंग करणाऱ्यांसाठी किंवा वजन वाढवण्यासाठी पनीर भुर्जी उत्तम आहे.

paneer Bhurji VS Egg Bhurji Nutrition

|

sakal

पचनक्रियेचा फरक

अंडे शरीरात सहज पचले जाते, तर पचनाच्या समस्या असलेल्या किंवा 'लॅक्टोज इन्टॉलरन्स' असलेल्या व्यक्तींना पनीर खाणे हेवी वाटू शकते.

paneer Bhurji VS Egg Bhurji Nutrition

|

Sakal

हृदय आणि कोलेस्ट्रॉल

अंड्याचे मर्यादित सेवन आरोग्यासाठी सुरक्षित आहे, तर पनीरमध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त असल्याने हृदयविकार असलेल्यांनी ते मर्यादित खावे.

paneer Bhurji VS Egg Bhurji Nutrition

|

Sakal

जीवनशैलीनुसार निवड

तुम्ही शाकाहारी असाल तर पनीर भुर्जीचा आणि जर तुम्ही मांसाहारी किंवा संतुलित हलका आहार शोधत असाल तर अंडा भुर्जीचा पर्याय निवडावा.

paneer Bhurji VS Egg Bhurji Nutrition

|

Sakal

ब्लड शुगर तपासण्याची अचूक वेळ कोणती? जाणून घ्या डॉक्टरांचा नियम

Right Time to Test Blood Sugar Level

|

Sakal

येथे क्लिक करा