Anushka Tapshalkar
बऱ्याचदा अनेकजण छातीत अचानक धडधड अनुभवतात. मात्र हे कशामुळे होतं हे त्यांना कळत नाही. बऱ्याचजणांचा ॲन्झायटी आणि पॅनिक अटॅकमध्ये गोंधळ उडतो. चला तर मग गोंधळ दूर करूया.
पॅनिक अटॅक हा अचानकपणे, कोणतीही पूर्वसूचना न देता येतो आणि भीती अथवा दहशतीची तीव्र भावना निर्माण करतो.
हा अटॅक हळूहळू वाढतो. तो तणाव, चिंता किंवा एखाद्या ठराविक कारणामुळे निर्माण होतो.
श्वास घ्यायला त्रास, छातीत दुखणं, हृदय वेगाने धडधडणं, घाम येणं, थरथरणं, वास्तवापासून तुटल्यासारखं वाटणं.
चिंता वाढलेली असते, चिडचिड, अंग टाइट होणं, विचारांची गर्दी, झोपेच्या समस्या, एकाग्रतेचा अभाव.
हा अटॅक काही मिनिटांतच तीव्रतेचा उच्चांक गाठतो आणि लवकर शांतही होतो.
हा अटॅक जास्त वेळ टिकतो, लक्षणांची तीव्रता अधूनमधून कमी-जास्त होत राहते.
पॅनिक अटॅक कोणत्याही कारणाशिवायही येऊ शकतो; तर अॅन्झायटी अटॅक बहुतेक वेळा तणाव किंवा चिंता यामुळे येतो.
दोन्ही प्रकार गंभीर असतात. योग्य थेरपी, प्रोफेशनल मदत, आणि स्वतःची काळजी घेतल्याने त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं.