सकाळ डिजिटल टीम
पपई हे स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी उपयुक्त फळ मानले जाते. पचन सुधारण्यासाठी, तसेच पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी पपई खूप फायदेशीर ठरते.
केवळ फळच नव्हे, तर पपईच्या बिया देखील शरीराला निरोगी ठेवण्याचे काम करतात. मात्र, काही लोकांनी पपईच्या बिया खाणे टाळणे आवश्यक आहे.
पपईच्या बियांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर, ओलिक अॅसिड, पॉलीफेनॉल, फ्लेव्होनॉइड्स, कार्पेन, मायरोसिनेज, पपेन आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आढळतात. हे घटक शरीरासाठी उपयुक्त असले तरी काही परिस्थितीत त्यांचा दुष्परिणाम होऊ शकतो.
ज्यांची प्रकृती गरम आहे, अशा व्यक्तींनी पपईच्या बिया खाऊ नयेत. कारण, बियांचा स्वभाव देखील गरम असतो आणि त्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
गर्भावस्थेत पपईच्या बिया खाल्ल्यास आई आणि बाळ दोघांनाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गरोदर महिलांनी या बिया खाणे पूर्णपणे टाळावे.
जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असेल, तर त्यांनी पपईच्या बिया खाऊ नयेत. यामुळे अॅलर्जिक प्रतिक्रिया अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकते.
पोटाशी संबंधित समस्या असणाऱ्यांनी पपईच्या बिया जास्त प्रमाणात खाऊ नयेत. या बिया नेहमी मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास त्याचा फायदा होतो.
ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी मात्र मर्यादित प्रमाणात पपईच्या बिया खाल्ल्यास फायदा होऊ शकतो. या बियांतील संयुगे वजन कमी करण्यास मदत करतात.