सकाळ डिजिटल टीम
तुम्ही ही पपईच्या बिया फेकुन देतात का? मग फेकण्यापुर्वी हे जाणून घ्या.
पपई जेवढी आरोग्यासाठी जेवढी फायदेशीर आहे तेवढ्याच फायदे तिच्या बियांचे देखील आहेत.
पपईच्या बियांचा उपयोग आणि फायदे कोणते आहेत जाणून घ्या.
पपईच्या बिया अनेक प्रकारे उपयुक्त आणि आरोग्यास फायदेशीर मानल्या जातात.
पपईच्या बिया पचनसंस्थेतील हानिकारक जीवाणू आणि परजीवींना मारतात, ज्यामुळे आतड्यांची समस्या कमी होते.
या बियांमध्ये फायबर भरपूर असल्याने, त्या बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करतात.
पपईच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि शरीराला हानिकारक संक्रमणांपासून वाचवतात.
पपईच्या बिया त्वचेतील मुरुम, डाग आणि त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करतात.
पपईच्या बियांचे मिश्रण मध आणि लिंबाच्या रसासोबत चेहऱ्यासाठी मास्क म्हणून वापरले जाऊ शकते.