Papaya Side Effects : पोषक पपईही ठरू शकते विषासारखी! 'या' लोकांनी अजिबात खाऊ नका

सकाळ डिजिटल टीम

फळे नेहमीच आरोग्यासाठी उत्तम मानली जातात. त्यापैकी पपई हे एक अत्यंत पौष्टिक आणि चवीला गोड फळ आहे.

Papaya Side Effects

|

esakal

...तर पपई ठरू शकते धोकादायक

पचनासाठी फायदेशीर असलेली पपई पोटाची काळजी घेते आणि शरीराला ऊर्जा देते. मात्र, काही लोकांसाठी हीच पपई धोकादायक ठरू शकते. आज आपण जाणून घेऊया, की कोणत्या व्यक्तींनी पपई खाणे टाळावे आणि त्यामागील कारणे काय आहेत.

Papaya Side Effects

| esakal

पपईतील पोषक घटक

पपईमध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B-9, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, लायकोपीन, बीटा-कॅरोटीन आणि विविध अँटिऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे हे फळ अत्यंत पोषक मानले जाते.

Papaya Side Effects

| esakal

स्तनपान करणाऱ्या महिलांनी पपई टाळावी

स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी पपई धोकादायक ठरू शकते. त्यामध्ये असलेले पपेन एन्झाइम बाळाच्या पचनसंस्थेवर प्रतिकूल परिणाम करू शकते. त्यामुळे हे फळ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Papaya Side Effects

|

esakal

मूतखड्याचा त्रास असणाऱ्यांनी पपईपासून दूर राहावे

किडनी स्टोन असलेल्या लोकांनी पपई खाणे टाळावे. पपईमध्ये ऑक्सॅलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असल्यामुळे खड्याचा आकार वाढू शकतो किंवा त्रास अधिक बळावू शकतो.

Papaya Side Effects

|

esakal

गर्भवती महिलांसाठीही पपई धोकादायक

गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय पपई खाऊ नये. पपईतील पपेन हे एन्झाइम गर्भातील बाळासाठी हानिकारक ठरू शकते आणि गर्भधारणेवर विपरीत परिणाम करू शकते.

Papaya Side Effects

| esakal

अॅलर्जी असणाऱ्यांनी पपईपासून सावध राहावे

ज्यांना कोणत्याही प्रकारची अॅलर्जी आहे, त्यांनी पपई खाणे टाळावे. हे फळ त्यांच्या अॅलर्जीची तीव्रता वाढवू शकते आणि आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Papaya Side Effects

|

esakal

पपई नेहमी मर्यादित प्रमाणात खावी

पपई आरोग्यासाठी फायदेशीर असली, तरी प्रमाण जास्त झाल्यास शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पपईचे सेवन नेहमी मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.

Papaya Side Effects

|

esakal

छातीत जळजळ झाली की काय करावे? 'हे' सोपे उपाय देतील झटपट दिलासा!

What Causes Chest Burning and Heartburn?

|

esakal

येथे क्लिक करा...