Saisimran Ghashi
नौशेरा–तावी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे गाव 1813 साली गुलाबसरंग राजाने जिंकले होते. स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये पाकिस्तानने येथे पहिला हल्ला केला होता.
पाकिस्तानकडून काबीज केलेले राजौरी भारताने १२ एप्रिल १९४८ रोजी पुन्हा जिंकले. हे युद्ध इतके भयंकर होते की 'तावी नदी रक्तलांछित झाली होती.'
गुज्जर मंडी चौक म्हणजे भारताच्या विजयाची साक्ष देणारे ऐतिहासिक ठिकाण, ज्यात रामा राघोबा राणे यांचा जयस्तंभ उभा आहे.
शूर मराठी योद्धा लेफ्टनंट रामा राघोबा राणे यांच्या नावाने काश्मीरमध्ये चौक उभारला गेला, कारण त्यांनी काश्मीरच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावली होती.
भूसुरुंगांनी भरलेला अरुंद रस्ता रणगाड्यांसाठी उघडण्यासाठी त्यांनी जीव धोक्यात घालून मार्ग तयार केला हेच त्यांच्या स्मारकाचे कारण.
५ वेळा जखमी होऊनही त्यांनी लढाई सोडली नाही. असा सैनिक स्मरणात राहणं गरजेचं नाही का?
काश्मीरच्या भूमीत उभारलेला हा चौक, आजही भारताच्या एकतेचा आणि मराठ्यांच्या पराक्रमाचा जिवंत पुरावा आहे.
जयस्तंभासोबत लावलेली माहिती, राणेंच्या शौर्याचं स्मरण करतं. तिथे उभं राहून प्रत्येक भारतीयाचं काळीज अभिमानाने फुलतं.
शौर्याच्या या गाथेसाठी त्यांना परमवीरचक्र मिळालं. हे नाव चौकात कोरलं जाणं म्हणजे त्यागाची मान्यता!
राणा राणेंचा चौक केवळ मराठी माणसाचा नाही, तर संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी स्मारक आहे. तुम्ही कधी काश्मीरला गेला तर 'राणा राघोबा राणे चौक'ला भेट द्या.