Anushka Tapshalkar
नुकताच केंब्रिज युनिव्हर्सिटीने Word of the Year 2025 घोषित केला आहे. हे एक एकतर्फी मानसिक नातं असतं, जिथे व्यक्तीला सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर, काल्पनिक कॅरेक्टर किंवा अगदी AI सोबतही जवळीक वाटते; जरी प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी.
Parasocial - Word of the Year 2025
Sakal
सोशल मीडियावरील 24/7 अपडेट्स, व्ह्लॉग्स, लाइव्ह्स यामुळे सेलिब्रिटींचं वैयक्तिक आयुष्य जवळून दिसतं. त्यामुळे ते खरंच आपले मित्र-मैत्रिण आहेत अशी भावना निर्माण होते.
Digital Media
Sakal
इन्फ्लुएन्सर्स या नात्याचा फायदा घेत मजबूत फॅन बेस तयार करतात. यामुळे खरेदीचे निर्णय, ब्रँडची निवड आणि ग्राहकांच्या आवडी-निवडीवर मोठा परिणाम होतो.
Influencer's Business
Sakal
अनेक युवक आपल्या आवडत्या व्यक्तीकडून बोलण्याची शैली, विचारसरणी किंवा चांगल्या सवयी आत्मसात करतात. त्यांच्याकडून प्रेरणा मिळते आणि ओळख घडते.
Mimicking Role Models and Creating Image
Sakal
हे नातं एकटेपणा कमी करण्यास मदत करतं. पण अत्याधिक गुंतवणूक झाली तर आत्मविश्वास कमी होणे, तुलना वाढणे किंवा सेलिब्रिटीबद्दल अस्वास्थ्यकर आसक्ती निर्माण होऊ शकते.
Impacts Mental Health
Sakal
एआय चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल साथीदारांशी लोक भावनिक संबंध जोडू लागले आहेत. ही भविष्यातील नातेसंबंधांच्या बदलत्या दिशेची मोठी ओळख आहे.
New Closeness With AI
Sakal
या एकतर्फी नात्यांमुळे समाजातील संवाद, अपेक्षा, नाती आणि AI वापरकर्त्यांमध्ये मोठे परिवर्तन दिसत आहे. 'खरे नाते' म्हणजे काय याची नव्याने व्याख्या केली जात आहे.
Changing Social Pattern
Sakal