सकाळ डिजिटल टीम
लहान बाळांची त्वचा खुप नाजूक असते. त्यामुळे त्यांना ऍलर्जी होण्याची शक्यता जास्त आसते.
तुम्ही ही तुमच्या बाळाला डायपर वापर असाल तर, डायपर बदलण्याचे योग्य नियम जाणून घ्या.
लहान मुलाला नियमित डायपर बदलण्याची आवश्यकता असते, खासकरून नवजात बालकांसाठी
दर २-३ तासांनी डायपर बदलणे आवश्यक आहे. काही वेळा बाळ झोपले असेल, तर डायपर बदलण्याची गरज नसते, परंतु डायपर ओला झाल्यावर बदलणे आवश्यक आहे.
दर ३-४ तासांनी डायपर बदलणे पुरेसे आहे. दिवसातून अनेक वेळा लघवी आणि शौचास जाण्याची शक्यता असते, त्यामुळे डायपर बदलणे आवश्यक असते.
रात्री डायपर बदलण्याची आवश्यकता कमी असते, कारण मुले रात्री जास्त झोपतात. परंतु डायपर ओला झाल्यावर बदलणे आवश्यक आहे.
डायपर बदलतांना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी जाणून घ्या.
डायपर बदलण्यापूर्वी मुलाला स्वच्छ आणि कोरडे करा त्या नंतर नवीन डायपर घालण्यापूर्वी मुलाला डायपर रॅश क्रीम लावू शकता.
डायपर बदलण्यासाठी मुलाला आरामदायक आणि सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच डायपर बदलण्यासाठी मुलाला नियमितपणे डायपर बदलण्याची सवय लावा.