हिवाळ्यात नवजात बाळाची अशी घ्या विशेष काळजी..

Aishwarya Musale

लहान बाळाची त्वचा अतिशय संवेदनशील असते. मुलांची त्वचा प्रौढांपेक्षा अधिक नाजूक असते. हिवाळ्याच्या काळात लहान मुलांमध्ये त्वचेच्या समस्या सर्वात सामान्य आहेत.

थंड वाऱ्यामुळे बाळाची त्वचा खडबडीत, कोरडी आणि खाज सुटते. अशा परिस्थितीत मुलांच्या त्वचेची काळजी घेण्याची गरज आहे.

पालकांनी हिवाळ्यात मुलांच्या त्वचेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. काही गोष्टींची काळजी घेतल्यास मुलांची त्वचा निरोगी, मुलायम आणि चमकदार ठेवता येते. 

मॉइश्चरायझिंग क्रीम

बाळाच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी मॉइश्चरायझिंग क्रीमचा वापर खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात मुलांची त्वचा खूप कोरडी आणि खडबडीत होते.

खोबरेल तेल

नारळाचे तेल बाळाच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. बाळाची आंघोळ झाल्यानंतर खोबरेल तेल लावा. ते ओलावा टिकवून ठेवते. 

आंघोळीच्या एक तास आधी तेल लावून मसाज करू शकता. हे देखील फायदेशीर आहे. खोबरेल तेलामध्ये व्हिटॅमिन ई असते ज्यामुळे त्वचा निरोगी होते. अशाप्रकारे, तेलाने मसाज केल्याने मुलांची त्वचा मुलायम आणि कोमल राहते

हलके लोकरीचे कपडे घाला

जास्त लोकरीचे कपडे परिधान केल्याने उष्माघात होऊ शकतो.

यासाठी दररोज बाळाच्या त्वचेची तपासणी करा. बाळाला हलके आणि मऊ लोकरीचे कपडे घालणे चांगले.

हृदय विकारचा धोका टाळायचा आहे, मग या गोष्टी रोज करा!