Hangover remedies : पार्टीचा 'हँगओव्हर' उतरवायचाय?, मग 'हे' उपाय एकदा कराच!

Mayur Ratnaparkhe

केळी खा -

 केळी खाल्ल्याने हँगओव्हर कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यात पोटॅशियम असते, जे अशक्तपणा आणि चक्कर घालवण्यात मदत करते.

आल्याचा तुकडा खा –

तुम्ही आल्याची चहा पिऊ शकता किंवा आलं चावू शकता. यामुळे आराम मिळेल आणि उलट्या टाळता येतील.

टोमॅटोचा रस प्या –

टोमॅटोचा रस आणि टोमॅटो पिल्याने थकवा दूर होण्यास मदत होते. तज्ञांच्या मते, टोमॅटोमधील फ्रुक्टोज अल्कोहोल तोडतो आणि शरीराला ताजेतवाने करतो.

लिंबू पाणी प्या –

एक ग्लास कोमट पाणी पिणे देखील फायदेशीर ठरू शकते. मध घालून ते पिल्याने शरीर डिटॉक्सिफाय होते आणि थकवा कमी होतो.

हलका नाश्ता करा –

पार्टी केल्यानंतर सकाळी हलका नाश्ता करा, कारण रिकाम्या पोटी समस्या वाढू शकतात. ओट्स, टोस्ट, फळे किंवा सूप सारख्या हलक्या अन्नाने सुरुवात करा.

पुरेशी झोप घ्या -

हँगओव्हरनंतर डोक्याला आराम देण्यासाठी पुरेशी झोप घ्या.

आंघोळ करा -

थंड पाण्याने आंघोळ करा आणि नंतर उबदार व्हा.  हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करणे सोयीस्कर .

Next : 'या' स्वादिष्ट गोड पदार्थांनी ख्रिसमस करा आणखी स्पेशल

Christmas Special Recipes

|

Sakal

येथे क्लिक करा