संतोष कानडे
पासपोर्ट आणि व्हिसा हे दोन्ही डॉक्युमेंट परदेश प्रवासासाठी आवश्यक असतात. पण कारणं वेगवेगळी आहेत.
पासपोर्ट म्हणजे तुमची आंतरराष्ट्रीय ओळख आणि एकप्रकारे नागरिकत्वाचा पुरावा असतो.
व्हिसा म्हणजे तुम्हाला परदेशात प्रवेश करण्याची परवानगी आणि तिथे राहण्याचीही परवानगी देणारं डॉक्युमेंट.
आपण ज्या देशाचे आहोत, तो देश आपल्याला पासपोर्ट देतो. तर तुम्ही ज्या देशात जाता त्या देशाकडून तुम्हाला व्हिसा मिळतो.
पासपोर्ट हा अतिशय आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही तुमच्या देशाबाहेर जाऊ शकत नाहीत.
आणि व्हिसाशिवाय तुम्ही पुढच्या देशात प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे हे दोन्ही कागदपत्रं महत्त्वाची आहेत.
पासपोर्ट 5–10 वर्षांसाठी वैध असतो, तर व्हिसाची वैधता देशानुसार बदलत असते.
पासपोर्ट प्रवाशांसाठी असतो. तर व्हिसा टुरिस्ट, वर्कर्स, विद्यार्थी अशा अनेक प्रकारांमध्ये मिळतो.
पासपोर्ट म्हणजे ओळखपत्र तर व्हिसा म्हणजे परवानगीपत्र; दोन्ही मिळूनच परदेश प्रवास शक्य आहे.