Pranali Kodre
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत १६ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सने पराभूत केले. श्रीलंकेच्या विजयात पाथुम निसंकाने शतक करत मोलाचा वाटा उचलला.
Pathum Nissanka
Sakal
पाथुम निसंकाने ५२ चेंडूत १० चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद १०० धावांची खेळी केली. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील दुसरे शतक होते.
Pathum Nissanka
Sakal
त्यामुळे आता पाथुम निसंका वनडेमध्ये किमान एक द्विशतक आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंमध्ये सामील झाला आहे.
Pathum Nissanka
Sakal
पाथुम निसंकापूर्वी केवळ चार खेळाडूंनी वनडेमध्ये किमान एक द्विशतक आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये दोन शतकं केली आहेत.
Pathum Nissanka
Sakal
भारताचा हिटमॅन रोहित शर्माने वनडे सर्वाधिक तीन द्विशतके केली आहेत, तसेच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५ शतके केली आहेत.
Rohit Sharma
Sakal
वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने वनडेत एक द्विशतक आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २ शतके केली आहेत.
Chris Gayle
Sakal
न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने वनडेत एक द्विशतक आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २ शतके केली आहेत.
Martin Guptill
Sakal
ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने वनडेत एक द्विशतक आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५ शतके केली आहेत.
Glenn Maxwell
Sakal
Suryakumar Yadav 3rd Indian Captain to Beat Pakistan in T20WC
Sakal