Swadesh Ghanekar
पंजाबच्या प्रियांश आर्याने काल ४२ चेंडूंत ७ चौकार व ९ षटकारांच्या मदतीने १०३ धावांची खेळी केली.
आयपीएलमध्ये शतक झळकावणारा तो आठवा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे.
शॉन मार्शने आयपीएलच्या पहिल्या पर्वात राजस्थान रॉयल्सविरुद्ध ११५ धावांची खेळी केली होती.
मनिश पांडेने २००९ मध्ये डेक्कन क्रॉनिकल हैदराबादविरुद्ध नाबाद ११४ धावा केल्या होत्या.
पॉल व्हॅल्थॅटी हा पंजाबकडून शतक झळकावणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू होता. त्याने CSK विरुद्ध २०११ मध्ये नाबाद १२० धावा केल्या होत्या.
२०२१ मध्ये देवदत्त पडिक्कलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध १०१ धावांची नाबाद खेळी केली होती.
यशस्वी जैस्वालने २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध १२४ धावा कुटल्या होत्या.
पंजाबच्या प्रभसिमरन सिंगने २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १०३ धावा चोपल्या होत्या.
मागच्या पर्वात साई सुदर्शनने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध १०३ धावांची खेळी केली होती.