चवीसोबत आरोग्यही! पावभाजी कशी असू शकते एक पौष्टिक आहार? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

स्ट्रीट फूड

पावभाजीकडे अनेकदा केवळ 'स्ट्रीट फूड' म्हणून पाहिले जाते पण तिचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. जाणून घ्या कोणते आहेत ते फायदे.

Pav bhaji benefits

|

sakal 

भाज्यांचे वैविध्य

पावभाजीमध्ये फ्लॉवर, मटार, गाजर, बटाटा, सिमला मिरची आणि टोमॅटो अशा विविध भाज्यांचे मिश्रण असते. यामुळे एकाच डिशमधून शरीराला विविध प्रकारचे विटामिन्स आणि मिनरल्स मिळतात.

Pav bhaji benefits

|

sakal 

फायबरचे प्रमाण

मटार, गाजर आणि कोबी यांसारख्या भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. हे फायबर पचनसंस्था सुधारण्यास आणि बद्धकोष्ठाचा त्रास कमी करण्यास मदत करते.

Pav bhaji benefits

|

sakal 

रोगप्रतिकारशक्ती

पावभाजी मसाल्यामध्ये हळद, मिरे, दालचिनी, लवंग आणि सुंठ असते. या मसाल्यांमध्ये दाहशामक (Anti-inflammatory) आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

Pav bhaji benefits

|

sakal 

अँटीऑक्सिडंट्सचा स्त्रोत

टोमॅटोमधील 'लायकोपीन' आणि सिमला मिरचीमधील 'व्हिटॅमिन सी' शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि त्वचेचे आरोग्य सुधारतात.

Pav bhaji benefits

|

sakal 

प्रथिने

मटार हे प्रथिनांचा एक चांगला वनस्पती-आधारित स्रोत आहेत. स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि शरीराच्या वाढीसाठी याची मदत होते.

Pav bhaji benefits

|

sakal 

निरोगी चरबी

जर पावभाजीमध्ये मर्यादित प्रमाणात घरगुती लोणी किंवा शुद्ध तुपाचा वापर केला, तर त्यातून शरीराला आवश्यक फॅटी ॲसिड्स मिळतात, जे मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

Pav bhaji benefits

|

sakal

पोषण

जी मुले थेट भाज्या खाण्यास टाळाटाळ करतात, त्यांना मॅश केलेल्या स्वरूपात सर्व भाज्यांचे पोषण देण्याचा पावभाजी हा एक चविष्ट मार्ग आहे.

Pav bhaji benefits

|

sakal 

लोह आणि खनिजे

बीट (रंगासाठी वापरल्यास) आणि हिरव्या भाज्यांमुळे शरीरातील लोहाची पातळी वाढण्यास मदत होते, ज्यामुळे रक्ताल्पता (Anemia) रोखता येवू शकते.

Pav bhaji benefits

|

sakal 

फ्रोझन मटार सगळ्यांसाठी नाही! ‘या’ लोकांनी खाल्ल्यास वाढू शकतात समस्या

Frozen Peas Side Effects:

|

Sakal

येथे क्लिक करा