Anuradha Vipat
जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट आणि साखरपुडा केल्यानंतर अभिनेत्री पवित्रा पुनिया आणि एजाज खान यांनी ब्रेकअप केलं.
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पवित्राने या ब्रेकअपमागील कारण सांगितलं आहे.
मुलाखतीत पवित्रा म्हणाली की, “जर एखादा पुरुष तुमच्यावर दबाव आणत असेल, तर त्या व्यक्तीला तुम्ही जाऊ द्या.
पुढे पवित्रा म्हणाली की, एखादी स्त्री समर्पितपणे वागत असेल तर ती चांगली असते, यात काही शंका नाही.
पुढे पवित्रा म्हणाली की,जर एखादा पुरुष सतत तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर तो आत्ममग्न असतो. हे आमच्यासोबतही घडलंय.
पुढे पवित्रा म्हणाली की,आम्ही आमचं नातं सुरुवातीला खूप सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण अखेर ते जमलंच नाही.
या नात्यात पुरुषत्व आणि स्त्रीत्वाचा संघर्ष खूप होता असं पवित्रा म्हणाली.