सकाळ डिजिटल टीम
पीसीओडी (PCOD) ही महिलांमधील वाढती समस्या बनली आहे. बदलती जीवनशैली, असंतुलित आहार याचे प्रमाण वाढले आहे. योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल करून पीसीओडीच्या लक्षणांवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.
Importance of Diet
sakal
पीसीओडीमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स आणि हार्मोन्सचे असंतुलन होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे काही विशिष्ट पदार्थांचे सेवन पूर्णपणे टाळणे किंवा अत्यंत मर्यादित करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
Avoid or Limit These Foods Today
sakal
साखरयुक्त पेये, सॉफ्ट ड्रिंक्स, पॅक केलेले ज्यूस आणि जास्त साखर असलेल्या डेझर्ट्सचे (मिठाई) सेवन टाळा. या पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते आणि इन्सुलिन रेझिस्टन्स वाढू शकतो.
Avoid Eating Sugar and Sweets
sakal
मैद्यापासून बनवलेले पदार्थ (जसे की पास्ता, व्हाईट ब्रेड, बिस्किटे) आणि तळलेले फास्ट फूड खाणे टाळा. हे पदार्थ पचनास जड असतात आणि यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते.
Refined Flour (Maida) and Fast Food
sakal
अति प्रक्रिया केलेले (Processed) पदार्थ, ट्रान्स फॅट असलेले पदार्थ खाऊ नका. तसेच, मद्यपानाचे सेवन आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते, त्यामुळे ते पूर्णपणे टाळावे.
Processed Foods
sakal
पीसीओडी नियंत्रित ठेवण्यासाठी फायबर आणि प्रथिनांनी (Proteins) युक्त असलेला आहार घ्यावा. आहारात भरपूर ताज्या हिरव्या भाज्या आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या फळांचा समावेश करावा.
What to Include in the Diet?
sakal
रिफाईंड धान्यांऐवजी संपूर्ण धान्य जसे की ज्वारी, बाजरी, ओट्स आणि ब्राऊन राईसचा आहारात वापर करा. यासोबतच शरीराला ताकद मिळण्यासाठी डाळी आणि कडधान्यांचे नियमित खा.
Whole Grains and Legumes/Sprouts
sakal
बदाम, अक्रोड, जवस आणि भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds) यांसारखा सुका मेवा खा. मांसाहार करत असल्यास अंडी आणि माशांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.
Dry Fruits and Healthy Fats
sakal
आहारासोबतच दररोज ३५ ते ४५ मिनिटे चालणे, व्यायाम किंवा योगासने करा. दिवसातून ७ ते ९ तासांची पुरेशी झोप घ्या. मानसिक ताण कमी करण्यासाठी प्राणायाम किंवा ध्यानाचा आधार घ्या.
Lifestyle
sakal
पीसीओडी असलेल्या प्रत्येक महिलेची प्रकृती आणि शरीराची गरज वेगळी असते. त्यामुळे आहारात कोणताही मोठा बदल करण्याआधी,कोणताही पदार्थ पूर्णपणे बंद करण्याआधी आहारतज्ज्ञांचा (Dietitian) सल्ला नक्की घ्या.
Important Note
sakal