PCOS आणि थकव्याला करा गुडबाय! फॉलो करा न्यूट्रिशनिस्टने सांगितलेल्या 'या' 5 सोप्या टिप्स

Anushka Tapshalkar

हार्मोनल समस्या योगायोगाने नाही

न्यूट्रिशनिस्ट रशी चौधरी यांच्या मते, PCOS, वेदनादायक पाळी, थकवा व मूड स्विंग्स यामागे रक्तातील साखरेचा असमतोल आणि सूज कारणीभूत असते.

Hormonal Imbalance | sakal

सकाळची सुरुवात ‘फॅट’ने करा

उठल्यावर सर्वप्रथम बदामाऐवजी मॅकॅडेमिया नट, ब्राझील नट किंवा अक्रोड खा. यामुळे ब्लड शुगर स्थिर राहण्यास मदत होते.

प्रोटीनची कमतरता ठेऊ नका

नाश्त्यात अंडी, डाळी किंवा प्रोटीन शेक घ्या. दररोज किमान 20–30 ग्रॅम प्रोटीन आवश्यक असल्याचे त्या सांगतात.

कार्ब्ससोबत फायबर अनिवार्य

भात, पोळी खाताना त्यासोबत तेवढ्याच प्रमाणात भाज्या घ्या. वजन कमी करायचे असल्यास हे प्रमाण 1:2 किंवा 1:3 ठेवा.

भारतीय महिलांसाठी प्रोटीन महत्त्वाचे

प्रत्येक भारतीय महिलेला दररोज सुमारे 80 ग्रॅम प्रोटीनची गरज असते, असे रशी चौधरी सांगतात.

sakal

लवकर रात्रीचे जेवण

सायंकाळी 5:30 पर्यंत जेवण पूर्ण करा. हे पाळणे अवघड असले तरी याचे फायदे मोठे असल्याचा दावा त्या करतात.

Early Dinner

| sakal

भावनिक आरोग्य

भावना दडपून ठेवल्यास त्याचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे मानसिक व भावनिक स्वच्छता महिलांसाठी अत्यंत गरजेची आहे.

Mental Health

|

sakal

संदर्भ

हा सल्ला Rashi Chowdhary यांनी Samantha Ruth Prabhu यांच्या पॉडकास्टमध्ये शेअर केला आहे.

Reference

| sakal

ध्यान करताना डोक्यात विचारांची गर्दी होतेय? कदाचित तुम्ही करताय ‘या’ चुका

Meditation Mistakes People Commonly Make

|

sakal

आणखी वाचा