बाळकृष्ण मधाळे
घरामध्ये पालींचा त्रास हा अनेकांसाठी डोकेदुखीचा विषय असतो. त्यामुळे त्यांना दूर ठेवण्यासाठी लोक विविध घरगुती उपाय करून पाहतात. त्यापैकी एक लोकप्रिय उपाय म्हणजे घरात मोराची पिसे ठेवणे.
Do Peacock Feathers Really Repel House Lizards?
esakal
असा समज आहे की, मोराची पिसे पाहिल्यावर पाल घाबरते आणि त्या जागेपासून दूर पळते. पण, हा उपाय खरोखर किती प्रभावी आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Do Peacock Feathers Really Repel House Lizards?
esakal
काहींच्या मते, मोराच्या पिसावर असलेली डोळ्यासारखी नक्षी ही पालींना घाबरवण्याचे मुख्य कारण असते. ही नक्षी पाहून पालीला एखाद्या मोठ्या प्राण्याचा डोळा असल्याचा भास होतो आणि त्यामुळे ती त्या ठिकाणाहून दूर जाते.
Do Peacock Feathers Really Repel House Lizards?
esakal
तर काही लोकांचा असा विश्वास आहे की, मोराच्या पिसांमधून एक विशिष्ट वास बाहेर पडतो, जो पालींना सहन होत नाही आणि त्यामुळे त्या त्या भागापासून लांब राहतात.
Do Peacock Feathers Really Repel House Lizards?
esakal
मात्र, या सर्व दाव्यांना ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.
Do Peacock Feathers Really Repel House Lizards?
esakal
म्हणजेच, मोराची पिसे ठेवली तर पाली नक्कीच पळून जातील, असे निश्चितपणे म्हणता येत नाही.
Do Peacock Feathers Really Repel House Lizards?
esakal
जर तुम्हाला घरातील पालींपासून खरंच सुटका हवी असेल, तर स्वच्छता राखणे, अन्नाचे अवशेष न ठेवणे आणि डांबरगोळ्यांसारखे (Naphthalene balls) उपाय वापरणे अधिक प्रभावी ठरू शकते.
Do Peacock Feathers Really Repel House Lizards?
esakal
Peacock Feather Benefits
esakal