Monika Shinde
पीनट बटर हे प्रोटीन आणि कॅल्शियमने भरलेलं असतं. हे हाडं मजबूत ठेवण्यासाठी आणि स्नायूंना बळकटी देण्यासाठी उत्तम पर्याय आहे, विशेषतः लहान मुलांसाठी.
ज्यांना नैसर्गिक पद्धतीने वजन वाढवायचं आहे, त्यांच्यासाठी पीनट बटर हे एनर्जी-डेंस अन्न आहे. त्यातील हेल्दी फॅट्स वजन वाढीसाठी उपयुक्त असतात.
पीनट बटरमध्ये विटामिन E आणि ओमेगा ६ फॅटी ॲसिड असतात, जे मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतात आणि लक्ष केंद्रित करण्यात मदत करतात.
हृदयासाठी उपयुक्त असलेल्या हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्समुळे पीनट बटर कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतो आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो.
पीनट बटरमध्ये फायबर आणि प्रथिने असल्यामुळे ते पचन हळूहळू होतं. यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते, मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त.
दिवसभरासाठी ऊर्जा हवी असेल तर पीनट बटर हा एक उत्तम पर्याय आहे. त्यातील पोषणद्रव्यं तुमचं शरीर आणि मेंदू दोघांनाही ताजेतवाने ठेवतात.
ब्रेड, फळं, स्मूदी किंवा पराठ्यासोबत पीनट बटर सहज मिसळता येतं. त्याचा चवदार व पौष्टिक असा वापर कोणत्याही वयात करता येतो.