सकाळ डिजिटल टीम
मकर संक्रांतीसाठी काळ्या रंगाची पैठणी विशेष महत्त्वाची आहे. महाराष्ट्रीयन महिलांसाठी पैठणी म्हणजेच एक खास प्रेम. चंद्रकळा पैठणी एक अत्यंत आकर्षक आणि सुंदर पर्याय आहे.
काळ्या रंगातील कॉटन इरकल आणि सिल्क इरकल साड्या ट्रेण्डिंग आहेत. ऑक्सिडाईज ज्वेलरीसोबत या साड्या एकदम आकर्षक दिसतात.
प्लेन काळ्या नारायणपेठ साडीला चमकदार काठ असतो, ज्यामुळे साडीला उठाव मिळतो. नारायणपेठ साडीवरच्या गडद रंगाच्या काठांचा आकर्षक लुक विशेष आकर्षक असतो.
संक्रांतीला काळी बनारसी साडी नेसन हा एक भन्नाट विचार असू शकतो.
हलक्या चंदेरी प्रकारातली काळी साडी पार्टीवेअर लूकसाठी उत्तम आहे. या साडीवर योग्य रंगाच्या दागिने घातल्यास खास दिसते.
संक्रांतीच्या सणासाठी काळी किंवा ग्रे रंगातली कांजीवरम साडी एक आकर्षक पर्याय आहे. कांजीवरम साडीचा पारंपरिक लुक संक्रांतीसाठी परफेक्ट आहे.
गढवाल सिल्क साडीच्या काळ्या रंगाच्या साड्या संक्रांतीच्या दिवशी आकर्षक दिसतात. गढवाल सिल्क साड्या असंख्य सुंदर रंगांमध्ये उपलब्ध असतात, आणि त्यातली काळी साडी कलेक्शनमध्ये असावीच.