क्रिस्पी फिश फ्राय बनवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स!

Aarti Badade

फिश फ्राय

फिश फ्राय करणे तसे सोपे आहे, पण योग्य पद्धत माहित नसल्यास मासे तुटतात किंवा व्यवस्थित तळले जात नाहीत. 'या' काही टिप्स वापरल्यास तुमचा प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल.

Fish fry recipe

|

Sakal

पहिली पायरी - स्वच्छता

परफेक्ट फिश फ्रायसाठी सर्वात आधी माशांचे तुकडे स्वच्छ धुवा आणि ते पूर्णपणे कोरडे करून घ्या. मासे ओले राहिल्यास मसाला व्यवस्थित चिकटत नाही.

Fish fry recipe

|

Sakal

खास मसाल्याचे मॅरिनेशन

एका भांड्यात हळद, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला, मीठ, आले-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस एकत्र करा. हा मसाला माशांच्या तुकड्यांना व्यवस्थित लावून २०-३० मिनिटे ठेवा.

Fish fry recipe

|

Sakal

कोटिंगचे गुपित

मॅरीनेट केलेल्या माशांवर बेसन किंवा तांदळाच्या पिठाचे पातळ कोटिंग करा. यामुळे फिशला मस्त सोनेरी रंग येतो आणि ती अधिक कुरकुरीत होते.

Fish fry recipe

|

Sakal

तळण्याची योग्य पद्धत

पॅनमध्ये मोहरीचे तेल चांगले गरम करा. तेलातून धूर आल्यावर मासे त्यात सोडा. मध्यम ते कमी आचेवर मासे तळल्यास ते आतून व्यवस्थित शिजतात आणि बाहेरून कुरकुरीत होतात.

Fish fry recipe

|

Sakal

दोन्ही बाजूंनी सोनेरी करा

माशांचे तुकडे अधूनमधून पलटत राहा, जेणेकरून ते दोन्ही बाजूंनी एकसारखे तळले जातील. कमी आचेवर तळल्यामुळे मासे जळत नाहीत.

Fish fry recipe

|

Sakal

गरमागरम सर्व्ह करा

तयार फिश फ्राय प्लेटमध्ये काढून त्यावर थोडा लिंबाचा रस, चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घाला. हिरवी चटणी किंवा ताकासोबत याचा आस्वाद घ्या!

Fish fry recipe

|

Sakal

उन्हाळ्यात नारळ पाण्यात 'सब्जा' मिसळून प्या! शरीरात दिसतील 'हे' बदल

Coconut water and Sabja benefits

|

Sakal

येथे क्लिक करा