Aarti Badade
काजू करी म्हणजे शाकाहारी जेवणातील एक शाही डिश. हॉटेलसारखी परफेक्ट ग्रेव्ही आणि चव घरी कशी मिळवायची? चला जाणून घेऊया ही सोपी पद्धत.
Kaju Curry recipe
sakal
यासाठी १/२ वाटी काजू, कांदा-टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, काश्मिरी लाल तिखट, गरम मसाला, धणे-जिरे पूड आणि खडे मसाले (वेलची, मिरी, दालचिनी) तयार ठेवा.
Kaju Curry recipe
Sakal
कढईत थोडे तेल गरम करा आणि त्यात काजू हलके सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. तळलेले काजू बाजूला काढून ठेवा, यामुळे भाजीला छान कुरकुरीतपणा येतो.
Kaju Curry recipe
Sakal
त्याच तेलात जिरे, काळी मिरी, दालचिनी आणि वेलची टाकून परता. त्यानंतर चिरलेला कांदा घालून तो गुलाबी रंगावर येईपर्यंत छान भाजून घ्या.
Kaju Curry recipe
Sakal
कांदा परतून झाल्यावर त्यात टोमॅटो प्युरी घाला. सोबतच, अर्धा तास भिजवलेल्या काजूंची मिक्सरवर पेस्ट करून ती ग्रेव्हीत मिसळा; यामुळे भाजीला हॉटेलसारखा दाटपणा येईल.
Kaju Curry recipe
Sakal
मिश्रणाला तेल सुटू लागल्यावर त्यात हळद, धणे-जिरे पूड, गरम मसाला आणि काश्मिरी लाल तिखट घाला. थोडं पाणी टाकून मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परता.
Kaju Curry recipe
Sakal
आता तुम्हाला हव्या असलेल्या घनतेनुसार (Consistency) पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. ग्रेव्हीला एक चांगली उकळी येऊ द्या.
Kaju Curry recipe
Sakal
उकळी आल्यावर तळलेले काजू घाला आणि १० मिनिटे मंद आचेवर शिजवा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गरमागरम तवा रोटी किंवा नानसोबत सर्व्ह करा!
Kaju Curry recipe
Sakal
Caramel Tadka Kheer
Sakal