सकाळ डिजिटल टीम
लग्नाचा सीझन सुरु झाला की सर्वात आधी कपडे आणि त्यावर घालायचे दागिने आणि इतर गोष्टींची लगबग सुरु होते.
अशातच तुमच्या कर्वी सिल्हूटसाठी साडीवर कोणत्या प्रकारचे ब्लाउज साजेसे वाटतील हा प्रश्न नक्कीच पडतो. मग या टिप्स नक्की फॉलो करा.
तुमच्या शरीरावर भरगच्च वाटणार नाही असे योग्य फॅब्रिक निवडा. सिल्क आणि ब्रोकेड या सीझनमध्ये खूप प्राधान्याने वापरतात.
स्वीटहार्ट आणि स्कूप नेक ब्लाउजमुळे तुमचे कॉलरबोन्स उठून दिसतात.
एकतर मोनोक्रोम ब्लाउज निवडा किंवा नैसर्गिकरित्या सडपातळ सिल्हूटसाठी घन (सॉलिड) रंग वापरा.
सामन्यातः गोलसर बांध्याच्या स्त्रिया गडद रंगांना पसंती देतात, कारण गडद रंगांमुळे शरीराचा बांधा पातळ आणि सुडौल दिसतो.
व्ही-नेक तुमच्या मध्यभागी लक्ष वेधून घेते आणि तुमची मान लांब असल्याचे दर्शविते.
योग्य ब्लाउजमुळे तुमच्या शरीराचा वक्राकार भाग उठावदार दिसतो आणि त्यामुळे तुमच्या पूर्ण शरीराची सिल्हूट बदलू शकते.