Aarti Badade
मासिक पाळीचे चक्र २८ दिवसांचे असते, परंतु २१ ते ३५ दिवसांचे चक्रही सामान्य मानले जाते. जर हे चक्र २१ दिवसांपेक्षा कमी असेल, तर एकाच महिन्यात दोनदा पाळी येऊ शकते.
Periods twice a month reasons
Sakal
एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स पाळीचे चक्र नियंत्रित करतात. अति तणाव किंवा बिघडलेली जीवनशैली यामुळे या हार्मोन्सचे संतुलन बिघडते, परिणामी पाळी अनियमित होते.
Periods twice a month reasons
Sakal
PCOS ही महिलांमधील एक सामान्य हार्मोनल समस्या आहे. यात ओव्हरीमध्ये छोट्या गाठी तयार होतात, ज्यामुळे पाळी वेळेवर येत नाही किंवा महिन्यातून दोनदाही येऊ शकते.
Periods twice a month reasons
Sakal
गर्भाशयात होणाऱ्या गाठींमुळे पाळीच्या दिवसात जास्त ब्लीडिंग होणे किंवा अनियमितता येणे असे प्रकार घडतात. गाठींच्या आकारानुसार पाळीचे वेळापत्रक बदलू शकते.
Periods twice a month reasons
sakal
हायपरथायरायडिज्म किंवा हायपोथायरायडिज्म दोन्ही स्थितींमध्ये थायरॉईड हार्मोन्सचा परिणाम मासिक पाळीवर होतो. ब्लीडिंग कमी-जास्त होणे,वारंवार पाळी येणे अशा समस्या उद्भवतात.
Periods twice a month reasons
Sakal
कामानिमित्त येणारा प्रचंड मानसिक ताण, अपुरी झोप आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे शरीराचे नैसर्गिक घड्याळ बिघडते, ज्याचा परिणाम मासिक पाळीवर होतो.
Periods twice a month reasons
sakal
जर महिन्यातून दोनदा पाळी येण्याचा त्रास वारंवार होत असेल, तर घरगुती उपाय करण्याऐवजी त्वरित स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वेळेवर निदान झाल्यास पुढील गुंतागुंत टाळता येते.
Periods twice a month reasons
Sakal
Buttermilk avoid drink this mistakes
Sakal