'इराण' शब्दामागे आर्यांचं कनेक्शन; १९३५ पूर्वीचं नाव होतं वेगळंच

संतोष कानडे

इराण

१९३५ पूर्वी इराण देशाचं नाव इराण नव्हतं तर पर्शिया असं होतं. या नावात बदल करुन इराण असं करण्यात आलं.

पर्शिया

पर्शिया हे नाव पाश्चिमात्य जगाने विशेषतः ग्रीकांनी दिलेलं होतं. इराणमधील पार्सा या प्रातांवरुन संपूर्ण देशाला पर्शिया म्हटलं जायचं.

इराण

इराण हे नाव या देशाचं मूळ स्थानिक नाव आहे. प्राचीन काळापासून इराणी लोक आपल्या देशाला इराण किंवा इराणशहर म्हणायचे.

वेगळी ओळख

१९२५ मध्ये सत्तेवर आलेल्या रेझा शाह पहृवी यांनी देशाला वेगळी ओळख देण्याचा निर्णय घेतला. पर्शिया हे नाव कमकुवत काळाचं प्रतीम मानलं गेलं.

पर्शियन

२१ मार्च १९३५ पर्शियन नवीन वर्षाच्या मुहूर्तावर रोजी रेझा शाह यांनी आदेश काढत इराण असं नाव ठेवलं

आर्यांची भूमी

इराण शब्दाचा उगम ऐर्याना या शब्दातून झाला. याचा अर्थ आर्यांची भूमी असा होतो. युरोपमध्ये आर्य शब्दाला महत्व होतं.

प्राचीन मुळं

आपली प्राचीन मुळं आर्यांशी जोडलेली आहेत, हे दाखवून देण्याचा इराणचा उद्देश होता.

वांशिक ओळख

शिवाय पर्शियन ही वांशिक ओळख होती. इराणमध्ये कुद, अझरी, पारशी अशा अनेक समुदायांचा समावेश होता.

मातृभाषा

असं असलं तरी आज इराणची मातृभाषा ही पर्शियन म्हणजे फार्सी हीच आहे. हीच अधिकृत राजभाषादेखील आहे.

खामेनेई यांच्या बोटातील अंगठीकडे जगाचं लक्ष का असायचं?

<strong>येथे क्लिक करा</strong>