संतोष कानडे
नाना फडणवीस (१२ फेब्रुवारी १७४२ – १३ मार्च १८००) हे उत्तर पेशवाईतील थोर मुत्सद्दी होते. त्यांचं मूळ नाव बाळाजी जनार्दन भानू.
रत्नागिरीजवळील वेळास येथील भानू आणि श्रीवर्धनचे भट यांचचा जवळचा संबंध होता.
राजाराम महाराजांच्या काळात नाना फडणवीसांचे पूर्वज मराठा राजवटीत विविध अधिकार पदांवर कार्यरत होते.
हबशांच्या छळामुळे देशावर आलेल्या बाळाजी विश्वनाथ भट यांनी सरसेनापती धनाजी जाधवांकडे नोकरी पत्करली. पुढे ते मराठेशाहीचे पेशवा बनले.
बाळाजी विश्वनाथांनी स्वतः शाहू महाराजांकडून राज्याची फडणविशी मिळवली आणि ती नानांचे आजोबा हरी महादजी भानूंना दिली.
दिल्लीहून परतताना झालेल्या मराठ्यांच्या कत्तलीत बाळाजी महादजी (नानांचे आजोबा) बळी पडले. पेशव्यांच्या जीवासाठी त्यांनी बलिदान दिलं.
पेशवे घराण्याने हे बलिदान कधीही विसरलं नाही. भानू घराण्याला पुण्यात मानाचं स्थान मिळालं.
नाना फडणवीस यांच्याकडे अवघ्या १४ व्या वर्षी फडणविशीची वस्त्रे आली आणि त्यांनी मुत्सद्देगिरीची जबाबदारी स्वीकारली.
पुढे नाना फडणवीस यांनी पेशवाईच्या सत्तेचा गाडा चालवला. इंग्रजांशी चर्चापासून ते मराठा साम्राज्य सावरण्यात त्यांचा मोठा वाटा होता.