Shubham Banubakode
पुण्यातील शुक्रवार पेठेतील शुक्रवार वाडा ही दुसरे बाजीराव पेशवे यांनी बांधलेली वैभवशाली वास्तू होती.
इ.स. १७९९ त्यांनी हा वाडा खरेदी करून त्याची डागडुजी केली. इ.स. १८०३ मध्ये हा वाडा बांधून पूर्ण झाला आणि बाजीरावांनी येथे कायमस्वरूपी वास्तव्य केले.
शुक्रवार वाडा हा दोन चौकी आणि पाच मजली होता. पाचव्या मजल्यावर चार कोपऱ्यांत चार बंगले बांधले होते, ज्यामधून पुण्याचा आसमंत स्पष्ट दिसायचा.
शुक्रवार वाड्यात बाजीरावांचे वास्तव्य सुरू झाल्याने शनिवारवाड्याचे महत्त्व कमी झाले. तो ‘थोरला सरकारवाडा’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
शुक्रवार वाड्यात नाचाचे समारंभ आणि श्रीव्यंकटेश उत्सवासारख्या प्रथा सुरू झाल्या, ज्यामुळे तो पुण्यातील करमणुकीचे केंद्र बनला.
इ.स. १८१८ मध्ये पेशवाई संपुष्टात आली आणि दुसरे बाजीराव इंग्रजांना शरण गेले. इ.स. १८२० मध्ये वाड्याला आग लागली, जी इंग्रजांनी विझवण्याचा प्रयत्न केला नाही. यामुळे संपूर्ण वाडा जळून खाक झाला.
शुक्रवार वाडा हा केवळ एक वास्तू नव्हता, तर पेशवेकालीन वैभव, कला, आणि संस्कृतीचा द्योतक होता.