संतोष कानडे
पेशवेकाळात गावांच्या सुरक्षा जबाबदाऱ्या स्थानिक प्रशासन व व्यक्तींवर आधारित होत्या.
आज जसं काही खेड्यांमध्ये पोलीस नाहीत, तसंच त्या काळातही गावांनी स्वतःच संरक्षणाची जबाबदारी उचलली होती.
गावच्या सुरक्षिततेची प्रमुख जबाबदारी पाटलाची असे. त्याला स्थानिक मदतनीस साथ देत.
रात्री गस्त घालणे, गावात येणाऱ्या जाणाऱ्यांची माहिती देणे आणि संशयितांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी मदतनीस पार पाडत.
पाटील आणि त्याचे सहकारी मिळून गुन्हेगारांचा शोध घेत. प्रत्येक गावातील व्यक्तींची माहिती पाटलाला असायची.
शहरांच्या सुरक्षेसाठी कोतवाल नेमले जात. त्यांची नियुक्ती पेशव्यांकडून होत असे.
कोतवालाच्या अधिपत्याखाली मुजुमदार, फडणीस, दप्तरदार आणि १०० ते १२५ शिपाई असत.
पेशवेकाळात कोतवालाचा वार्षिक पगार सुमारे ६०० रुपये होता – त्या वेळच्या तुलनेत मोठी रक्कम.
लोहगड, पुरंदर, सिंहगड यांसारख्या किल्ल्यांवरील शिबंदी परिसराच्या सुरक्षेसाठी तैनात असत.
पेशवेकालीन पुण्यात घाशीराम कोतवालाने कठोर पण प्रभावी कारकीर्द गाजवली. नंतर कोतवाली मक्त्याने देण्याची पद्धत सुरू झाली.