पेट्रोल-डिझेल आणखी महागणार, दर नियंत्रणात ठेवणं का कठीण? वाचा कारण

सूरज यादव

पेट्रोल-डिझेल दरवाढ

भारतात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झालीय. यात आणखीही वाढ होण्याची शक्यता आहे.

Petrol Diesel Price

|

esakal 

युद्धाचा फटका

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे इंधन तेलाच्या किंमतीचा भडका उडाला आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यानंतरही भारतात दर वाढवले नव्हते.

Petrol Diesel Price

|

esakal 

कच्चे तेल

फेब्रुवारीपासून कच्च्या तेलाचे दर 73 डॉलरवरून १२० डॉलर प्रति बॅरल इतके झाले. मात्र त्यानंतर किंमत १०० डॉलरपेक्षा कमी झालीय.

Petrol Diesel Price

|

esakal 

नुकसान

सध्या कच्च्या तेलाच्या बाजारात असलेल्या परिस्थितीमुळे भारतात तेल उत्पादक कंपन्यांवर दबाव आहे. त्यामुळे कंपन्यांना दर दिवशी हजारो कोटींचा तोटा होता आहे.

Petrol Diesel Price

|

esakal 

दरवाढीनंतर दिलासा

आता तेल दर वाढवल्यानं दिवसाला एक हजार कोटींचा तोटा कमी होत आहे. मात्र अजूनही होणारं नुकसान जास्त आहे.

Petrol Diesel Price

|

esakal 

पुरवठा

होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्यानं भारतात येणारं कच्चं तेल, एलपीजी यांची जहाजे अडकली आहेत. पुरवठा कमी असल्यानं किंमती वाढत चालल्या आहेत.

Petrol Diesel Price

|

esakal 

आयात ठप्प

भारताला लागणाऱ्या कच्च्या तेलापैकी जवळपास ८५ टक्के कच्चं तेल आयात केलं जातं. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतील उलथापालथीचा परिणाम भारतातही दिसून येतो.

Petrol Diesel Price

|

esakal 

दरवाढीचा दबाव

इराण अमेरिका युद्ध अद्याप थांबण्याची चिन्हे नाहीत. जागतिक बाजारातही पुरवठा कमी असल्यानं कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झालीय. या वाढीमुळे भारतात इंधन दरावर दबाव कायम आहे.

Petrol Diesel Price

|

esakal 

कोल्हापूरचं गोकुळ, मुंबईला दूध पुरवठा वाढवण्यासाठी झालेली सुरुवात; इतिहास माहितीय का?

Kolhapur Gokul Dairy History

|

esakal 

इथं क्लिक करा