Aarti Badade
पूर्वी येथे भरपूर फळांची शेती होत असल्यामुळे या गावाला 'फलस्थान' म्हणून ओळखलं जायचं. त्यावरूनच नाव पडलं – फलटण.
फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याचं शिवरायांशी अतूट नातं. सईबाई आणि दिपाबाई अशा कन्या शिवाजी व मालोजी राजांना दिल्या गेल्या होत्या.
हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर फलटणचं भूषण. राम, लक्ष्मण, सीतेच्या मनोहर मूर्ती, दीपमाळा आणि प्राचीन कहस यामुळे मंदिर विशेष ठरतं.
श्रीराम मंदिरालगत राधाकृष्ण, दत्त, गरुड आणि उत्तरेला दत्तात्रय मंदिर आहे. हे मंदिर श्रीमंत मुदोजीराव नाईक यांनी बांधले.
हे मंदिर एकाच प्रचंड शिळेतून कोरल्यासारखं भासणारं. पाच फण्यांची नागीण, दुहेरी शाळुंका आणि कोनाड्यांतील विविध देवतांच्या मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण.
फलटणपासून २० किमीवर असलेला हा गड मध्यम आकाराचा पण मजबूत. शिवाजी महाराजांच्या काळात उभारलेला हा किल्ला 'किल्ले ताथवडा' नावानेही ओळखला जातो.
गड चढताना साधुमहाराजांचा मठ, गुहा, मारुती मंदिर, तातोबा महादेवाचं मंदिर आणि अनेक भुयारं भेटतात – ही एक गडवाटाची अनुभूती.
उत्तर रामायणातलं घटनास्थळ म्हणून प्रसिद्ध. सीतामाई, लव-कुश व वाल्मिकी ऋषींचे संदर्भ येथे सापडतात. सीतेचं एकटं मंदिर येथेच आहे.
सीतामाई डोंगरापासून या दोन पवित्र नद्या उगम पावतात. निसर्ग, अध्यात्म आणि इतिहास यांचा अनोखा संगम.
शिवकालीन वारसा, मंदिरे, गड किल्ले आणि धार्मिक श्रद्धेची केंद्रं – फलटण हा महाराष्ट्रातील एक विस्मरणात गेलेला सांस्कृतिक रत्न आहे.