चार्जर सतत हातात? फोनची बॅटरी लाइफ वाढवणाऱ्या ‘या’ 4 स्मार्ट ट्रिक्स जाणून घ्या

Aarti Badade

बॅटरीची समस्या आणि उपाय

दिवसभर फोनचा वापर करताना बॅटरी टिकवणं हे एक मोठं आव्हान असतं. पण काही छोट्या बदलांमुळे तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी लाईफ सहज वाढवू शकता.

Smartphone battery saving tips

|

Sakal

ब्राइटनेसवर नियंत्रण

तुमच्या फोनचा डिस्प्ले सर्वात जास्त बॅटरी खर्च करतो. त्यामुळे ब्राइटनेस नेहमी गरजेनुसार सेट करा किंवा 'ऑटो-ब्राइटनेस' मोड वापरा. जास्त ब्राइटनेस बॅटरी वेगाने संपवतो.

Smartphone battery saving tips

|

Sakal

अनावश्यक फीचर्स बंद ठेवा

ब्लूटूथ (Bluetooth), जीपीएस (GPS) आणि लोकेशन यांसारखे फीचर्स बॅटरीचे मोठे शत्रू आहेत. जेव्हा गरज नसेल, तेव्हा हे फीचर्स बंद ठेवा, यामुळे बॅटरी दीर्घकाळ टिकेल.

Smartphone battery saving tips

|

Sakal

नोटिफिकेशन्स

अनेक अ‍ॅप्स सतत नोटिफिकेशन्स पाठवत असतात, ज्यामुळे फोनचा स्क्रीन वारंवार सुरू होतो. अनावश्यक अ‍ॅप्सचे नोटिफिकेशन्स बंद करा; यामुळे बॅटरीची मोठी बचत होईल.

Smartphone battery saving tips

|

Sakal

बॅटरी सेव्हर मोडचा वापर

फोनमध्ये असलेला 'बॅटरी सेव्हर मोड' किंवा 'लो पॉवर मोड' नेहमी ऑन ठेवा. हा मोड बॅकग्राउंडमधील अनावश्यक प्रोसेस थांबवून बॅटरी सेव्ह करण्यास मदत करतो.

Smartphone battery saving tips

|

Sakal

बॅकग्राउंड अ‍ॅप्स तपासा

वापरून झाल्यानंतर अ‍ॅप्स पूर्णपणे बंद करण्याची सवय लावा. बॅकग्राउंडमध्ये सुरू असणारे अ‍ॅप्स फोनच्या प्रोसेसरवर ताण देतात आणि बॅटरी ओढतात.

Smartphone battery saving tips

|

Sakal

चार्जिंगची योग्य पद्धत

फोनची बॅटरी कधीही ०% पर्यंत संपवू नका आणि १००% पूर्ण चार्ज करणंही टाळा. बॅटरी २०% ते ८०% च्या दरम्यान ठेवणं फोनच्या आरोग्यासाठी उत्तम असतं.

Smartphone battery saving tips

|

Sakal

बॅटरी लाईफमध्ये होईल सुधारणा

या चार बाबींची काळजी घेतल्यास तुम्हाला तुमच्या फोनच्या बॅटरी बॅकअपमध्ये नक्कीच फरक जाणवेल. तुमचा फोन स्मार्ट वापरा आणि बॅटरी वाचवा!

Smartphone battery saving tips

|

Sakal

घराचा कायापालट करायचा आहे? या सोप्या टिप्स फॉलो करा; तुमचं घर दिसेल लक्झरी!

Home a Refreshing Makeover

|

Sakal

येथे क्लिक करा