तुमचा फोन हॅक झालाय का? ६ बदल दिसत असतील तर सावध व्हा

सकाळ डिजिटल टीम

मोबाईल हॅक

तुमचा फोन हॅक झाला असेल तर फोनमध्ये काही विचित्र बदल तुम्हाला जाणवू शकतात. फोन हॅक झालाय कसं ओळखायचं? हे आपण पाहू.

Phone Hacked

|

Esakal

धोका

फोन हॅक झाल्याचं लवकर लक्षात आल्यास पुढील धोके टाळता येतात. यासाठी होणारे बदल माहिती असणं गरजेचं आहे.

Phone Hacked

|

Esakal

चार्जिंग

फोन नवा असेल किंवा नेहमीप्रमाणे वापर सुरू असताना अचानक चार्जिंग वेगानं संपणं असामान्य आहे. वापर वाढला नसतानाही चार्जिंग संपत असेल तर हॅक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Phone Hacked

|

Esakal

डेटा

विनाकारण मोबाईलच्या डेटाचा वापर वाढला तर ही गोष्ट धोक्याची घंटा ठरू शकते.

Phone Hacked

|

Esakal

गरम

फोन गरम होणे किंवा सतत हँग होणं हेसुद्धा फोन हॅक झाल्याचं लक्षण आहे.

Phone Hacked

|

Esakal

अनोळखी फाइल

तुमच्या फोनमध्ये तुम्ही इन्स्टॉल न केलेली अॅप्स, फाइल्स, फोटो दिसू शकतात.

Phone Hacked

|

Esakal

कॉल, मेसेज

तुमच्या फोनवरून तुम्हालाच माहिती न होता कॉल किंवा मेसेज पाठवले जात असतील तर हे फोन हॅक झाल्याचं लक्षण आहे.

Phone Hacked

|

Esakal

जाहिरात, नोटिफिकेशन

पॉप अप जाहिराती किंवा नोटिफिकेशन सतत येत असतील तर तुमचा फोन हॅक झालाय किंवा हॅक करण्याचा प्रयत्न होत आहे.

Phone Hacked

|

Esakal

काळजी

तुमच्या फोनमध्ये हॅक झाल्याचे संकेत देणारे बदल जाणवल्यास तात्काळ महत्त्वाचे पासवर्ड बदला आणि फोनची सुरक्षा सेटिंग्ज तपासून घ्या.

Phone Hacked

|

Esakal

इंदिरा गांधींना 'गुंगी गुडिया' कोणी म्हटलं होतं? काय होता नेमका किस्सा?

Indira Gandhi

|

Esakal

इथं क्लिक करा