Shubham Banubakode
आजही राजकारणात 'गुंगी गुडिया' हा शब्द ऐकायला मिळतो. पण हा शब्द नेमका कुणासाठी आणि कोणत्या कारणामुळे वापरला गेला, यामागे एक इतिहास आहे.
Who Called Indira Gandhi 'Gungi Gudiya'
esakal
पंतप्रधानपदाची धुरा प्रथमच सांभाळत असताना इंदिरा गांधी यांच्यासाठी 'गुंगी गुडिया' हा शब्द वापरण्यात आला होता.
Who Called Indira Gandhi 'Gungi Gudiya'
esakal
सुरुवातीला इंदिरा गांधी सार्वजनिक कार्यक्रम, संसद किंवा भाषणांमध्ये फार कमी बोलत असत. त्यांच्या अबोल स्वभावामुळे विरोधकांना टीकेची संधी मिळाली.
Who Called Indira Gandhi 'Gungi Gudiya'
esakal
इंदिरा गांधींचे वैयक्तिक डॉक्टर डॉ. के. पी. माथुर यांनी 'द अनसीन इंदिरा गांधी' या पुस्तकात त्यांच्या सुरुवातीच्या संकोची स्वभावाचे अनेक प्रसंग नमूद केले आहेत.
Who Called Indira Gandhi 'Gungi Gudiya'
esakal
१९६९ चा अर्थसंकल्प सादर करताना त्या प्रचंड तणावाखाली होत्या. त्यांना बोलताना शब्दही नीट बाहेर पडत नव्हते, असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.
Who Called Indira Gandhi 'Gungi Gudiya'
esakal
समाजवादी विचारवंत आणि ज्येष्ठ नेते राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधींच्या अबोल स्वभावावर टीका करत त्यांना 'गुंगी गुडिया' अशी उपमा दिली होती.
Who Called Indira Gandhi 'Gungi Gudiya'
esakal
काही वर्षांतच इंदिरा गांधी यांनी आपल्या निर्णयक्षम नेतृत्वाने स्वताची वेगळी ओळख निर्माण केली.
Who Called Indira Gandhi 'Gungi Gudiya'
esakal
बांग्लादेश निर्मिती, पाकिस्तानविरुद्धचा विजय या निर्णयांमुळे इंदिरा गांधी पुढे 'आयर्न लेडी' म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
Who Called Indira Gandhi 'Gungi Gudiya'
esakal
Prashant Kishor salary
esakal