Saisimran Ghashi
काल ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानवर पुन्हा 12 हल्ले झाले आहेत
पाकिस्तानातील लाहोर, कराची, गुजरांवाला, घोटकी, चक्रवाल आणि उमरकोट या शहरांमध्ये स्फोटांची मालिका सुरु आहे.
एकूण ६ शहरांमध्ये १२ वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाले असल्याची सुत्रांची माहिती आहे.
लाहोरमध्ये नौदलाच्या तळाजवळ मोठा स्फोट झाला आहे, हल्ल्यानंतर आकाशात धुराचे लोट दिसत होते.
कराचीसह इतर शहरांमध्येही ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले आहेत.
रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयावर मोठा बॉम्बस्फोट झाला आहे.
हे स्फोट नियोजित आणि समन्वय साधून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या स्फोटांमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं आणि अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
भारतीय लष्करानं थेट पाकिस्तानच्या लाहोरजवळील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. बाकी हल्ल्यांची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारली नाहीये