Saisimran Ghashi
बिहारमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांनी नेपाळमार्गे घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिस मुख्यालयाने २८ ऑगस्ट २०२५ रोजी बिहारमध्ये तातडीने हाय अलर्ट जारी केला आहे
हसनैन अली (रावळपिंडी), आदिल हुसेन (उमरकोट), आणि मोहम्मद उस्मान (बहावलपूर) अशी दहशतवाद्यांची नावे आहेत.
हे तिन्ही दहशतवादी काठमांडूमधून ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात बिहारमध्ये दाखल झाल्याची शंका आहे.
बिहार पोलिसांनी दहशतवाद्यांचे फोटो आणि पासपोर्ट माहिती जाहीर करून सीमावर्ती जिल्ह्यांना सतर्क केले आहे
विधानसभा निवडणुकीमुळे पोलिस संभाव्य दहशतवादी कारवायांवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
सर्व जिल्ह्यांतील गुप्तचर यंत्रणेला संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आणि कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
एसआयआर आणि विरोधी नेत्यांच्या भेटींच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्यात आली आहे.