Monika Shinde
मूळव्याध म्हणजे पाइल्स ही सामान्य समस्या आहे जी चुकीच्या आहार आणि जीवनशैलीमुळे निर्माण होते. यामुळे जळजळ, सूज आणि वेदना निर्माण होतात. योग्य उपायांनी ती टाळता येऊ शकते.
योग गुरु बाबा रामदेव यांचा सल्ला आहे की मूळव्याधपासून बचावासाठी नैसर्गिक उपाय करा. घरच्या घरी सोपे पद्धती वापरून पाचन सुधारता येते आणि वेदना कमी होतात.
सकाळी आणि संध्याकाळी नागदोनच्या ३ पानांचा सेवन करा. हे पान मूळव्याधाची सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. नियमित सेवनाने आराम मिळतो.
थंड दूधामध्ये थोडा लिंबाचा रस घालून पिणे फायदेशीर आहे. यामुळे आतड्यांचे पचन सुधारते आणि मूळव्याधाची तीव्रता कमी होते.
संध्याकाळी किंवा सकाळी त्रिफळा चूर्णाचे सेवन करा. हे पचन सुधारते, बद्धकोष्ठता दूर करते आणि मूळव्याधाच्या वेदना कमी करतो.
फायबरयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. भाजीपाला, फळे, डाळी यांचा समावेश करून नियमित पाचन ठेवा. यामुळे हळूहळू मूळव्याध कमी होते.
दररोज साधी व्यायाम आणि योग करा. सीटिंग पोस्टर, हलके चालणे आणि पेल्विक योगासने हळूहळू आराम आणतात. ही सवय फायद्याची ठरते.