आतडे होतील साफ! मूळव्याध टाळण्यासाठी आहारात करा ‘हे’ बदल

Aarti Badade

बद्धकोष्ठता - मूळव्याधाचे मूळ कारण

चुकीचा आहार आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे बद्धकोष्ठता होते. पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे गुदद्वाराच्या नसांवर ताण येतो आणि मूळव्याधाची समस्या उद्भवते.

Piles home remedies

|

Sakal

मूळव्याधाची गंभीर लक्षणे

शौचाच्या वेळी रक्तस्त्राव होणे, गुदद्वाराच्या जागी खाज किंवा गाठ जाणवणे, बसताना त्रास होणे आणि सतत थकवा जाणवणे ही मूळव्याधाची प्रमुख लक्षणे आहेत.

Piles home remedies

|

Sakal

फायबरयुक्त आहाराची जादू

आतडे स्वच्छ ठेवण्यासाठी आहारात फायबरचे प्रमाण वाढवा. फायबरमुळे मल मऊ होतो, ज्यामुळे शौचास त्रास होत नाही आणि आतड्यांमधील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.

Piles home remedies

|

Sakal

पाणी पिण्याचे महत्त्व

दिवसभरात भरपूर पाणी प्यायल्याने आतड्यांमधील मल कोरडा पडत नाही. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि मूळव्याधाच्या वेदनांपासून मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.

Piles home remedies

|

sakal

'हे' पदार्थ आवर्जून खा

ओट्स, नाचणी, हिरव्या पालेभाज्या, सफरचंद, पेरू आणि ताक यांचा दैनंदिन आहारात समावेश करा. हे पदार्थ पचायला हलके असून आतड्यांचे आरोग्य उत्तम राखतात.

Piles home remedies

|

Sakal

मांसाहार आणि तिखट

चिकन, मटण आणि अतितिखट पदार्थांचे सेवन टाळा. मांसाहार पचवण्यासाठी आतड्यांना जास्त पाणी लागते, ज्यामुळे अपचन होऊन बद्धकोष्ठता वाढण्याची शक्यता असते.

Piles home remedies

|

Sakal

वेळीच उपचार करा

मूळव्याध हा 'सायलेंट किलर' आजार ठरू शकतो. लक्षणे दिसताच घरगुती उपायांसोबतच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, जेणेकरून शस्त्रक्रियेची वेळ येणार नाही.

Piles home remedies

|

sakal

हार्ट अटॅकचा धोका टाळायचाय? 'हे' 5 सुपरफूड्स वाढवतात 'गुड कोलेस्ट्रॉल'!

Good cholesterol foods for heart

|

Sakal

येथे क्लिक करा