Aarti Badade
आजकाल कमी वयात हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढले आहे; याचे मुख्य कारण म्हणजे चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव, ज्यामुळे 'बॅड कोलेस्ट्रॉल' वाढते.
Good cholesterol foods for heart
Sakal
हृदयाच्या आरोग्यासाठी पुरुषांमध्ये एचडीएल ४० पेक्षा जास्त आणि महिलांमध्ये ५० पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे; हे शरीरातील अतिरिक्त चरबी यकृतापर्यंत नेण्यास मदत करते.
Good cholesterol foods for heart
Sakal
सॅल्मन, बांगडा आणि हिल्सा यांसारख्या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स भरपूर असतात, जे ट्रायग्लिसराइड्स कमी करून हृदयाचे संरक्षण करतात.
Good cholesterol foods for heart
Sakal
जवसाच्या बियांमध्ये विरघळणारे फायबर्स आणि ओमेगा-३ असते; हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करून निरोगी संतुलन राखण्यास मदत करतात.
Good cholesterol foods for heart
Sakal
अक्रोड, बदाम आणि पिस्ता हे हेल्दी फॅट्सचे उत्तम स्रोत आहेत; ते थेट एचडीएल वाढवत नसले तरी, यकृतातील वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचे कार्य सुधारतात.
Good cholesterol foods for heart
Sakal
स्वयंपाकात किंवा सॅलड ड्रेसिंगसाठी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलचा वापर केल्याने एचडीएलची पातळी वाढण्यास आणि एलडीएल कमी होण्यास मोठी मदत होते.
Good cholesterol foods for heart
Sakal
सफरचंद, बेरी, द्राक्षे आणि रंगीबेरंगी शिमला मिरची यांसारखी फायबरयुक्त फळे शरीरातील घाण बाहेर काढून हृदयाला दीर्घकाळ तरुण आणि तंदुरुस्त ठेवतात.
Good cholesterol foods for heart
Sakal
diabetes drink benefits
Sakal