Monika Shinde
पायलट बनण्याचं स्वप्न अनेक तरुण पाहतात. आकाशात उडण्याचा रोमांच, शिस्त, जबाबदारी आणि मोठा पगार या करिअरला खास बनवतात.
फक्त विमान उडवणं नाही, तर जिद्द, संयम आणि शिस्त लागते. लहानपणापासून मनात रुजलेलं हे स्वप्न पायलट बनवण्याचा आधार असतं.
कमर्शियल पायलट होण्यासाठी 12वी नंतर DGCA मान्यताप्राप्त फ्लाइंग स्कूलमधून किमान 200 तासांचे प्रशिक्षण आवश्यक आहे. परीक्षा आणि मेडिकल टेस्टही उत्तीर्ण करावी लागते.
पायलट प्रशिक्षणाचा खर्च साधारण 35 लाख ते 1 कोटी रुपये पर्यंत असतो. फ्लाइंग स्कूल, तास, टाइप रेटिंग या सर्व गोष्टींवर खर्च अवलंबून असतो.
उड्डाणापूर्वी हवामान, मार्ग, इंधन आणि पर्यायी विमानतळांचे नियोजन करणे पायलटची प्राथमिक जबाबदारी आहे, जेणेकरून प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करता येईल.
उड्डाणादरम्यान विमानाची तांत्रिक तपासणी, ATC शी संपर्क राखणे, आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय घेणे ही जबाबदाऱ्या पायलटवर असतात.
फ्रेशर पायलट 1.5 ते 3 लाख रुपये प्रति महिना मिळवतो. अनुभव वाढल्यावर पगार 8–12 लाख किंवा त्याहून अधिक होतो, आंतरराष्ट्रीय फ्लाइट्समध्ये अधिक वाढते.
पगाराव्यतिरिक्त पायलटला हाऊसिंग, प्रवास सवलत, हेल्थ इन्शुरन्स आणि वार्षिक रजा मिळते. या सर्व सुविधांमुळे करिअर अधिक आकर्षक ठरतो.