सकाळ डिजिटल टीम
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील पिणी गावात दरवर्षी ५ दिवसांचा अनोखा उत्सव साजरा होतो.
या काळात महिला कपडे परिधान करत नाहीत, घराबाहेर पडत नाहीत आणि पतीशी संवादही टाळतात.
या दिवसांत पुरुषांनाही संयमाचे पालन करावे लागते. मद्यपान, मांसाहार वर्ज्य असतो.
ही प्रथा श्रावण महिन्याच्या अखेरीस साजरी केली जाते. लोकांचा विश्वास आहे की जर नियम तोडले, तर गावावर आपत्ती येऊ शकते.
प्रथेचा उगम ‘लाहू घोंड’ देवतेच्या कथेपासून होतो. पूर्वी गावावर राक्षस हल्ला करत असत. देवतेने त्याचा वध केला आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली.
आज अनेक महिला हलकी वस्त्रे परिधान करतात, काही सहभागी होत नाहीत, तरीही ही प्रथा पिढ्यानपिढ्या जपली जात आहे.
या ५ दिवसांच्या काळात गावात कोणत्याही बाहेरील व्यक्तीला येण्यास मनाई असते.
कोणताही बाहेरील व्यक्ती या उत्सवात सहभागी होऊ शकत नाही.