गुलाबी रिबन कसा बनला ब्रेस्ट कॅन्सरचं प्रतीक? एका महिलेने घडवला इतिहास

Shubham Banubakode

ब्रेस्ट कॅन्सर मोहिम

ऑक्टोबर सुरू झाला की अनेक इमारतींवर गुलाबी रिबन दिसतात. स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करणं, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

Pink Ribbon History

|

esakal

कसं होतं पहिलं रिबन?

या मोहिमेची सुरुवात कॅलिफोर्नियातील शार्लट हेली यांनी केली. त्यांनी सुरुवातीला गुलाबी नव्हे, तर पीच रंगाचे रिबन स्वतः बनवले होते.

Pink Ribbon History

|

esakal

कुठून मिळाली प्रेरणा?

हेली यांच्या आजीचा वयाच्या ४५व्या वर्षी स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू झाला होता. त्यांची बहीण आणि मुलगीही या आजारातून बऱ्या झाल्या होत्या.

Pink Ribbon History

|

esakal

सरकारला प्रश्न

हेली रिबनसोबत एक कार्डही देत असत. कर्करोगाच्या अर्थसंकल्पातील कमी निधी प्रतिबंधासाठी वापरला जात असल्याबद्दल त्यांनी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Pink Ribbon History

|

esakal

गुलाबी रिबनची सुरुवात

१९९२ मध्ये ‘सेल्फ’ मासिकाच्या संपादक अलेक्झांड्रा पेनी यांनी हेली यांच्याकडे त्यांच्या कल्पनेचा वापर करण्याची परवानगी मागितली; मात्र हेली यांनी नकार दिला.

Pink Ribbon History

|

esakal

कसा बदलला रिबनचा रंग?

हेली यांना हा उपक्रम व्यावसायिक कंपन्यांच्या हातात द्यायचा नव्हता. त्यानंतर गुलाबी रंगाचा पर्याय पुढे आला आणि मोहिमेला नवी ओळख मिळाली.

Pink Ribbon History

|

esakal

लाखो लोकांपर्यंत संदेश

१९९२ मध्ये एस्टी लॉडरच्या मेकअप काउंटरवर सुमारे १५ लाख गुलाबी रिबन वाटण्यात आले. त्यासोबत स्तनांची स्वतः तपासणी कशी करावी, याची माहितीही दिली गेली.

Pink Ribbon History

|

esakal

मोहिमेवरही प्रश्नचिन्ह

कंपन्या गुलाबी रिबनचा वापर विक्री वाढवण्यासाठी करतात. त्यामुळे उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्यातून कर्करोग जागरूकता किंवा संशोधनासाठी किती मदत मिळते का हे तपासणं महत्त्वाचं आहे.

Pink Ribbon History

|

esakal

विदर्भात औरंगजेबाच्या मुलाने बांधला होता ऐतिहासिक किल्ला; काय आहे याचा इतिहास?

Balapur Fort

|

esakal

हेही वाचा -