बाईकवरून रोड ट्रिपचा प्लॅन करताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Mansi Khambe

बाईक रोड ट्रिप

बाईक रोड ट्रिपचं म्हटलं तर, लोकांना लेह-लडाखला जायला सर्वात जास्त आवडते. याशिवाय जयपूर-जैसलमेर, बंगळुरू, दार्जिलिंग-सिक्कीम, तवांग अशी ठिकाणे बाईक ट्रिपसाठी खूप पसंत केली जातात.

Bike Trip | ESakal

नियोजन

बाईक ट्रिप करताना वाटेत दिसणाऱ्या सुंदर दृश्यांचे कौतुक करण्यापासून ते साहसाचा आनंद घेण्यापर्यंतचा अनुभव जर तुम्हाला संस्मरणीय बनवायचा असेल तर त्याचे वेळीच नियोजन करणे गरजेचे असते.

Bike Trip | ESakal

महत्त्वाच्या गोष्टी

बाईकने प्रवास करणे सुरुवातीला खूप साहसी वाटेल, पण ते तुमच्या संयमाची परीक्षा घेण्यासारखे असते. अशावेळी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Bike Trip | ESakal

बाईकची सर्व्हिसिंग

ट्रिपला जाण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाईक, जर त्यात थोडीही समस्या असेल तर ट्रिप खराब होऊ शकते. म्हणून जाण्यापूर्वी बाईक सर्व्हिसिंग करून त्यानंतर ती चालवून, ब्रेकपासून क्लचपर्यंत सर्व काही व्यवस्थित काम करत आहे की नाही हे तपासा.

Bike Trip | ESakal

कागदपत्र

बाईकप्रवासात ड्रायव्हिंग लायसन्स, विमा, प्रदूषण प्रमाणपत्र आणि बाईकचा आरसी असे महत्वाची कागदपत्रे सोबत ठेवणे. याशिवाय, आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र यांसारखी कागदपत्रेही सोबत ठेवा.

Bike Trip | ESakal

इंधनाची व्यवस्था

बाईकने प्रवासाला जात असाल तर वाटेत पेट्रोल पंप कुठे असतील ते आधीच शोधा जेणेकरून तुमच्या गाडीत त्यानुसार इंधन असेल. याशिवाय मेडिकल स्टोअर्स, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, हॉटेल्स इत्यादींची माहिती मिळवा. यामुळे गरज पडल्यास काळजी करण्याची गरज पडणार नाही.

Bike Trip | Esakal

या गोष्टी विसरू नका

बाईक प्रवासात चांगल्या दर्जाचे हेल्मेट खरेदी करण्यासोबत हातमोजे, कोपर आणि गुडघ्याचे गार्ड खरेदी करा. तसेच हवामानानुसार कपडे निवडा, जसे की रेनकोट, वॉटरप्रूफ जॅकेट, चांगली पकड असलेले शूज, इ.

Bike Trip | ESakal

औषधे सोबत ठेवा

बाईक प्रवासात सर्व सुरक्षिततेच्या वस्तू सोबत ठेवण्याव्यतिरिक्त, उलट्या, ताप, अतिसार, ओआरएस इत्यादी किरकोळ समस्यांपासून आराम मिळविण्यासाठी गोळ्या देखील सोबत ठेवाव्यात.

Bike Trip | ESakal

'या' देशातील नागरिकांना नाही लागत इनकम टॅक्स, कारण काय?

Income Tax | ESakal
येथे क्लिक करा