संतोष कानडे
भारतीय रिझर्व्ह बँक प्लास्टिक किंवा पॉलिमरच्या नोटा छापण्याबद्दल गांभीर्याने विचार करीत आहे. पटणा आणि मुंबईत झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.
पॉलिमर नोट खास पॉलिप्रोपाइलीन प्लास्टिक सबस्ट्रेटपासून बनवण्यात येते. बनावट नोटा रोखण्याची क्षमता या नोटांमध्ये आहे.
कागदी १० रुपयांची नोट छापण्यासाठी १.०१ रुपये लागतात. तर २० च्या नोटेला १ रुपया, ५० च्या नोटेला १.२२ रुपये खर्च येतो.
कागदी १०० रुपयांच्या नोटेसाठी १.२० ते १.५१ रुपये लागतात. २०० च्या नोटेसाठी २.९३ प्रति नोट, ५०० च्या नोटेसाठी २.२९ रुपये खर्च येतो.
कागदी नोटांच्या तुलनेत प्लास्टिक नोटा छापण्यासाठी २ ते ३ टक्के जास्तीचा खर्च येऊ शकतो.
समजा कागदाची एक नोट छापण्यासाठी १ ते ३ रुपये खर्च येत असेल तर त्या तुलनेत प्लास्टिक नोट छापण्यासाठी २ ते ६ रुपये खर्च येऊ शकतो.
सुरुवातीला जास्तीचा खर्च अपेक्षित आहे. परंतु या नोटांचे फायदे लांबपल्ल्याचे आहेत.
कागदी नोटा मोठ्या प्रमाणावर खराब होतात. २०२५ या एका वर्षात २३.८० अरब नोटा खराब झाल्याने माघारी घेण्यात आल्या आहेत.
परंतु पॉलिमर नोट पाण्याने किंवा हाताळल्याने खराब होत नाही. त्यामुळेच जगभरातील लोक सध्या असा प्लास्टिक नोटांवर भर देत आहेत.