संतोष कानडे
रात्रीच्या वेळी कुत्रे जोरजोरात विव्हळतात किंवा रडतात, यामुळे लोक घाबरतात. यामागे नेमकं कारण काय आहे, ते पाहूया.
जुन्या समजुतीनुसार, कुत्र्यांना आत्मा किंवा अदृश्य शक्ती दिसतात असं मानलं जातं. पण त्यात खरंच तथ्य आहे का?
कुत्र्यांची ऐकण्याची आणि वास घेण्याची क्षमता माणसांपेक्षा खूप जास्त असते, असं विज्ञान सांगतं.
कुत्रे दूरवरचा आवाज ऐकू शकतात. दूरवरचा सायरन, इतर कुत्र्यांचे आवाज किंवा अतिसूक्ष्म ध्वनी ऐकून ते प्रतिक्रिया देतात.
काही वेळा कुत्रे एकमेकांशी संवाद साधण्यासाठीही रात्री ओरडतात. एकटेपणा, भीती किंवा तणावामुळेही कुत्रे रडल्यासारखे आवाज काढतात.
रात्रीचे शांत वातावरण असल्यामुळे त्यांचे आवाज अधिक भेसूर आणि मोठे वाटतात.
काही कुत्रे चंद्रप्रकाश किंवा अनोळखी हालचालींमुळे अस्वस्थ होतात. आजारी किंवा जखमी असलेले कुत्रेही वेदनेमुळे रात्री रडू शकतात.
कुत्र्यांचे रात्री रडणे हे बहुतेक वेळा नैसर्गिक वर्तन आणि तीव्र संवेदनक्षमतेशी संबंधित असते. त्यामुळे त्यांना घाबरण्याची गरज नाही.