सकाळ डिजिटल टीम
मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्थीने नुकतीच झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा गाजवली.
त्याने स्पर्धेतील ३ सामन्यांत एकूण ९ विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये न्यूझीलंविरूद्धच्या सामन्यात त्याने फायफर पूर्ण केला.
वरूण चक्रवर्थीची भारतीय क्रिकेटमधील पुनरागमनाची कहाणी प्रेरणादायी आहे.
क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी वरूणने अनेक गोष्टी केल्या आहेत.
त्याने आर्किकेक्चरमध्ये आपले पदवी शिक्षण पूर्ण केले आणि आर्किटेक्ट म्हणून नोकरी देखील केली. पण क्रिकेटसाठी त्याने नोकरी सोडली.
भारतीय फिरकीपटूला सहाय्यक दिग्दर्शक व्हायचे होते. त्यासाठी त्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरूवात केली.
तो सहाय्यक दिग्दर्शक होऊ शकला नाही, पण त्याने चित्रपटात २ -३ सिन्समध्ये काम केले आहे.
त्यावेळी त्याला दिवसाला १४०० रूपये इतका पगार मिळायचा.