PM मोदींचे १२ वर्षातले १२ महत्त्वाचे निर्णय; कलम ३७०, नोटबंदी ते अग्निवीर

सूरज यादव

मोदींची १२ वर्षे

नरेंद्र मोदी यांनी आजच्याच दिवशी १२ वर्षांपूर्वी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यांचा सलग तिसरा कार्यकाळ सुरू आहे.

12 years of PM Modi

|

Esakal

कलम ३७०

५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवण्यात आलं. राज्याचे जम्मू - काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्र शासित प्रदेशात विभाजन केलं

12 years of PM Modi

|

Esakal

महिला आरक्षण

संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदी सरकारने महिलांना लोकसभा, विधानसभेत ३३ टक्के आरक्षण मंजूर केलं.

12 years of PM Modi

|

Esakal

नोटबंदी

२०१६ मध्ये ८ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींनी अचानक रात्री ८ वाजता नोटबंदी घोषणा केली होती. ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटांचे निश्चलीकरण केलं होतं.

12 years of PM Modi

|

Esakal

जीएसटी

देशात स्वातंत्र्यानंतर कर प्रणालीत मोठा बदल करताना एक देश एक टॅक्ससाठी जीएसटी लागू केला. १ जुलै २०१७ रोजी मध्यरात्री जीएसटी लागू केला.

12 years of PM Modi

|

Esakal

ट्रिपल तलाक रद्द

मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा मंजूर करून ट्रिपल तलाकला गुन्हा ठरवण्यात आलं. मुस्लिम महिलांना अधिकार देण्यासाठी हे मोठं पाऊल ठरलं.

12 years of PM Modi

|

Esakal

अग्निवीर

लष्करात भरतीसाठी नवं मॉडेल स्वीकारून तरुणांना ४ वर्षांसाठी अग्निवीर म्हणून संधी देण्याचा निर्णय घेतला गेला.

12 years of PM Modi

|

Esakal

राम मंदिर

अयोध्येत राम जन्मभूमि वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बांधकामाचा निर्णय सरकारने घेतला. ट्रस्ट स्थापन केल्यानंतर २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गेली.

12 years of PM Modi

|

Esakal

सीएए

२०१९मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला. याअंतर्गत पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानातील बिगरमुस्लीम अल्पसंख्यांकांना भारताचं नागरिकत्व देण्याची तरतूद केली.

12 years of PM Modi

|

Esakal

डिजिटल इंडिया - जनधन

२०१५मध्ये डिजिटल इंडिया आणि जनधन खात्याच्या व्यवस्थेनं अनेक बदल झाले. भारत आज जगात सर्वाधिक डिजिटल पेमेंट करणारा देश बनलाय.

12 years of PM Modi

|

Esakal

लष्कराचे शत्रूंवर हल्ले

२०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक, पुलवामा हल्ल्यानंतर एअर स्ट्राइक तर पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवलं.

12 years of PM Modi

|

Esakal

सवर्णांना आरक्षण

देशात सवर्णांना आरक्षणाचा निर्णय २०१९मध्ये घेण्यात आला. आर्थिक निकषाच्या आधारे १० टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला गेला.

12 years of PM Modi

|

Esakal

संसदरत्न पुरस्कार कोणत्या खासदारांना मिळतो? किती रक्कम आणि सुविधा मिळतात?

Parliament

इथं क्लिक करा