सूरज यादव
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आफ्रिकेतील नामिबिया देशाच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी पंतप्रधान मोदींना नामिबियानं त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवलं.
नामिबियानं ऑऱ्र ऑफ द मोस्ट एंशिएंट वेल्वित्चिया मिराबिलीस हा त्यांच्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार मोदींना दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा नामिबियाचा पहिलाच दौरा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०१४ पासून आतापर्यंत २७ देशांनी त्यांचा सर्वोच्च पुरस्कार दिलाय. यात ८ मुस्लिम देशांचाही समावेश आहे.
२०१६ मध्ये त्यांना पहिला पुरस्कार मिळाला होता. २०२५मध्ये या वर्षाच्या सात महिन्यात त्यांना ७ पुरस्कार मिळाले आहेत.
गेल्या काही वर्षात पंतप्रधान मोदींनी मध्य पूर्वेपासून युरोप, आफ्रिका देशांचे दौरे केले. या दौऱ्यात त्यांना अनेक मुस्लिम देशांनीही गौरवलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवैत, इजिप्त, बहरीन, मालदीव, युएई, पॅलेस्टाइन, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया या मुस्लिम देशांनी पुरस्कार दिले आहेत.
अमेरिका, भूटान, ग्रीस, पलाऊ, पापुआ न्यू गिनी, फिजी, गुयाना, बार्बाडोस, नायजेरिया, डोमिनिका, रशिया, ब्राझील, त्रिनिदाद अँड टोबॅगो, घाना, साइप्रस, श्रीलंका, मॉरिशिअस या देशांकडूनही पंतप्रधान मोदींचा गौरव करण्यात आलाय.
भारताच्या आतापर्यंतच्या पंतप्रधानांमध्ये नरेंद्र मोदी यांना इतर देशांकडून सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग यांना प्रत्येकी दोन पुरस्कार मिळाले होते.
सुनील गावस्करांबद्दल 'या' १० गोष्टी माहिती आहेत का?