बाळकृष्ण मधाळे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिक्कीम दौऱ्यातील एक खास क्षण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
PM Narendra Modi Plays Football With Children
esakal
नेहमीप्रमाणे अधिकृत कार्यक्रम आणि बैठकींमध्ये व्यस्त दिसणारे पंतप्रधान यावेळी स्थानिक मुलांसोबत फुटबॉल खेळताना पाहायला मिळाले. त्यांच्या या सहज आणि उत्साही अंदाजाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
PM Narendra Modi Plays Football With Children
esakal
गंगटोकमध्ये पंतप्रधान मोदी यांनी स्थानिक मुलांच्या गटात सहभागी होत त्यांच्यासोबत फुटबॉल खेळला. खेळताना ते मुलांशी संवाद साधताना, हसत-खेळत आनंद घेताना दिसले.
PM Narendra Modi Plays Football With Children
esakal
हा अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत “Energizing Session” असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाले.
PM Narendra Modi Plays Football With Children
esakal
या वेळी पंतप्रधान मोदी पारंपरिक कुर्ता-पायजमाऐवजी ट्रॅक पँट आणि स्पोर्ट्स शूजमध्ये दिसले. त्यांचा हा वेगळा लूकही चर्चेचा विषय ठरला.
PM Narendra Modi Plays Football With Children
esakal
अनेकांनी त्यांच्या या साधेपणाचे आणि मुलांमध्ये मिसळण्याच्या स्वभावाचे कौतुक केले.
PM Narendra Modi Plays Football With Children
esakal
ईशान्य भारतात फुटबॉलला विशेष महत्त्व आहे. सिक्कीम, मिझोरम, मणिपूर आणि मेघालय यांसारख्या राज्यांमध्ये फुटबॉल हा लोकांच्या जीवनशैलीचा भाग मानला जातो.
PM Narendra Modi Plays Football With Children
esakal
या भागातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली असून ‘इंडियन सुपर लीग’सारख्या स्पर्धांमध्येही त्यांचा मोठा सहभाग दिसून येतो.
पंतप्रधान मोदींच्या या कृतीकडे केवळ विरंगुळा म्हणून न पाहता, तरुणांशी संवाद साधण्याचा आणि त्यांच्या आवडी-निवडी समजून घेण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिले जात आहे.
PM Narendra Modi Plays Football With Children
esakal
काही राजकीय विश्लेषकांनी याचा संबंध पश्चिम बंगालमधील फुटबॉलप्रेमी मतदारांशी जोडण्याचाही प्रयत्न केला आहे.
PM Narendra Modi Plays Football With Children
esakal
बंगालमध्ये फुटबॉल हा भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा खेळ मानला जातो. त्यामुळे या कृतीकडे प्रतीकात्मक संदेश म्हणूनही पाहिले जात आहे.
PM Narendra Modi Plays Football With Children
esakal
दरम्यान, सिक्कीमच्या ५० व्या राज्य स्थापना दिनानिमित्त आयोजित समारोप कार्यक्रमातही पंतप्रधान मोदी सहभागी झाले.
PM Narendra Modi Plays Football With Children
esakal
Gold Astrology Benefits
esakal