PM Modi Red Fort Speech: पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून केल्या नऊ मोठ्या घोषणा; ज्या भारताला विकसित राष्ट्र बनवणार!

Mayur Ratnaparkhe

प्रधानमंत्री विकासित भारत रोजगार योजना -

पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनानिमित्त तरुणांसाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना लागू केल्या आहेत. सरकारने या योजनेला प्रधानमंत्री विकासित भारत रोजगार योजना असे नाव दिले आहे.

सरकार जीएसटी सुधारणांसाठी सज्ज -

सरकार आता उच्चाधिकार पुनरावलोकन समितीच्या अहवालावर जीएसटीमध्ये सुधारणा करणार आहे. सरकार दिवाळीत नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा आणणार आहे.

भारताला 'सुरक्षा कवच' मिळणार -

पंतप्रधान मोदींनी येत्या १० वर्षांत भारतासाठी सुरक्षा कवच जाहीर केले आहे. यासाठी सरकार 'मिशन सुदर्शन चक्र' वर काम करणार आहे. हे सुरक्षा कवच भारताच्या प्रत्येक भागाचे रक्षण करण्यासाठी बनवले जाईल.

रिफॉर्म टास्क फोर्स भारताची गती निश्चित करणार -

सुधारणेचा वेग वाढवण्यासाठी, पंतप्रधान मोदींनी एका समर्पित पथकाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. या पथकाला रिफॉर्म टास्क फोर्स असे नाव देण्यात आले आहे. या पथकाचे काम रखडलेल्या सुधारणा वेळेवर पूर्ण करणे असेल.

हाय-पॉवर्ड डेमोग्राफी मिशन -

राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी 'उच्च हाय-पॉवर्ड डेमोग्राफी मिशन' बद्दल माहिती दिली. या मोहिमेद्वारे, देशातील बेकायदेशीर घुसखोरी आणि स्थलांतर थांबवले जाईल.

 'नॅशनल डीपवॉटर एक्सप्लोरेशन मिशन'ची घोषणा-

पंतप्रधान मोदींनी 'नॅशनल डीपवॉटर एक्सप्लोरेशन मिशन'ची घोषणा केली. या मिशनअंतर्गत, भारत कच्चे तेल आणि वायूसाठी सागरी संसाधनांचा वापर करेल, ज्यामुळे इतर देशांवरील आपले अवलंबित्व कमी होईल.

‘नॅशनल क्रिटिकल मिनरल्स’ मिशनची घोषणा -

पंतप्रधान मोदींनी नॅशनल क्रिटिकल मिनरल्स मिशनची घोषणा केली आहे, ज्याद्वारे देश महत्त्वाच्या खनिजांमध्ये आपली ताकद वाढवून विकासाच्या मार्गावर पुढे जाईल. या अभियानांतर्गत, भारतातील १,२०० ठिकाणी महत्त्वाच्या खनिजांचा शोध घेतला जाईल.

अणुऊर्जा दहापट वाढणार -

पंतप्रधान मोदींनी पुढील दोन दशकांत भारताची अणुऊर्जा १० पट वाढवण्याबद्दल म्हटले आहे. म्हणजेच, देशात १० नवीन अणुभट्ट्या बांधल्या जात आहेत. हे अभियान पूर्ण झाल्यानंतर देशवासीयांना स्वस्त वीज मिळण्याची अपेक्षा आहे.

जेट इंजिन देशातच बनवले जाणार-

आता भारत स्वतः लढाऊ विमानांचे जेट इंजिन बनवण्याची तयारी करत आहे. यासाठी, पंतप्रधान मोदींनी शास्त्रज्ञ आणि तरुणांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

Next : देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती, पण स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधानच का भाषण करतात?

Flag Hosting | ESakal
येथे पाहा